पेट्रोल 10 रुपये, डिझेलच्या दरात 6 रुपये वाढ; भारताशेजारी उडालाय महागाईचा भडका

भारताशेजारील पाकिस्तानात आजमितीस महागाईचा आगडोंब(India) उसळला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती तर वाढल्या आहेतच त्याशिवाय मागील काही दिवसांपासून इंधनाच्या दरातही वाढ होत आहे. आताही पाकिस्तान सरकारने वाढत्या अडचणी कमी करण्यासाठी आणि महसुलात वाढ करण्यासाठी इंधनाच्या दरात मोठी वाढ केली आहे. डॉन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार जागतिक बाजारातील चढ उतारामुळे इंधनाच्या दरात वाढ झाली आहे.

नव्या निर्णयानुसार पाकिस्तान सरकारने पेट्रोलच्या(India) दरात जवळपास दहा रुपये तर डिझेलच्या दरात 6 रुपये प्रति लीटर अशी मोठी दरवाढ केली आहे. या दरवाढीनंतर पेट्रोल 275.6 रुपये तर हाय स्पीड डिझेल 283.63 रुपये प्रती लिटर महाग झाले आहे. पाकिस्तान सरकारच्या या निर्णयाने तेथील नागरिक कमालीचे नाराज झाले आहेत. पाकिस्तानात आधीच इंधनाचे दर खूप जास्त आहेत. वाढलेले दर कमी करण्याची गरज असताना सरकारने मात्र थेट दहा रुपयांची वाढ केली आहे.

देशातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती पाहता ही वाढही खूप मोठी आहे. इतक्या जास्त दराने इंधन खरेदी करणे लोकांना परवडणारे नाही. मात्र या गोष्टीचा विचार सरकारने केल्याचे दिसत नाही. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी भाववाढ करणे हाच एक पर्याय सरकारकडे शिल्लक राहिल्याचे दिसत आहे. कारण, या संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान सरकारने आयएमएफकडे कर्जाची मागणी कली आहे. मात्र, संघटनेने कर्ज देताना अत्यंत जाचक अटी लादल्या आहेत.

सरकारने आता जी भाववाढ केली आहे ही त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले जात आहे. या भाववाढीच्या माध्यमातून सरकार जास्तीत जास्त महसूल गोळा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने याआधीही विजेच्या दरात वाढ करून पाकिस्तानी नागरिकांन शॉक दिला होता. इंधनाच्या दरात तर सातत्याने वाढ होत आहे. याआधीही सरकारने इंधनाच्या दरात वाढ केली होती. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हेही वाचा :

ऐन एकादशीला एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप, वारकाऱ्यांचे होणार प्रचंड हाल

प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, कोल्हापुरातून आरक्षण बचाव यात्रा

टीम इंडियाला धक्का! हार्दिक पांड्याची श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेतून माघार…