पिक्चर अभी बाकी हैं… बाहुबली 3 संदर्भात मोठी अपडेट

एस.एस. राजामौली दिग्दर्शित बाहुबली चित्रपटाने(film) भारतीय सिनेमामध्ये एक नवीन पायंडा रचला. या फ्रेंचायझीचे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. बाहुबली चित्रपटामुळे भारतीय सिनेमाला जगभरात पुन्हा एक नवी ओळख मिळाली.

चित्रपटातील(film) कलाकार, दिग्दर्शन, वीएफएक्स, पटकथा सर्वच गोष्टींचं कौतुक झालं. बाहुबली 2 चित्रपट रिलीज झाल्यानंतरच बाहुबली 3 चित्रपटाची चर्चा सुरु झाली होती. आता बाहुबली चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. कंगुवा चित्रपटाच्या निर्मात्याने मोठा खुलासा केला आहे.

बाहुबली चित्रपटामुळे अभिनेता प्रभास याला खरा स्टारडम मिळाला. अनुष्का शेट्टी, राणा दगुब्बती, राम्या कृष्णन या कलाकारांनाही या चित्रपटाने प्रसिद्धी मिळवून दिली. बाहुबलीचा पहिला भाग रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या भागाची लोक प्रतीक्षा करत होते, त्यानंतर बाहुबलीचा दुसरा भाग रिलीज झाल्यानंतरही बाहुबली तिसऱ्या भागाचीही उत्कंठा निर्माण झाली होती.

अभिनेता सूर्याचा आगामी कंगुवा चित्रपटाचा निर्माता के.ई. ज्ञानवेल राजा याने मोठा गौप्यस्फोट केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बाहुबली 3 चित्रपट सध्या प्लॅनिंगच्या टप्प्यात आहे. गेल्या आठवड्यात चित्रपट निर्मात्यांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान मला याची माहिती मिळाली. बाहुबली 1 आणि बाहुबली 2 बॅक टू बॅक बनवल्यानंतर आता ते बाहुबली 3 चित्रपट बनवण्याची योजना करत आहेत.’

हेही वाचा:

शरद पवारांचे अजितदादा गटाला दोन मोठे धक्के

CV ठेवा तयार, IT क्षेत्रात फ्रेशर्संना मोठी संधी, पगारही चांगला मिळणार

दारू पिऊन छेड काढणाऱ्या कंडक्टरला मुलींनी दिला चोप, चपला काढून बडवलं अन् … Video Viral