बॉलिवूड अभिनेत्री(actress) सोनाली बेंद्रे नुकतीच विमानतळावर दिसली आहे. त्यावेळी सोनालीच्या हाताला प्लाॅस्टर दिसले. त्यामुळे चाहतेही खूप नाराज झाले आहे. सोशल मीडियावर तिच्या या व्हिडिओने चांगलाच धुमाकूळ घातला असून, चाहते तिच्या तब्येतीची चौकशी करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सोनाली बेंद्रे(actress) गडद निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स परिधान करून दिसत आहे. तिच्या खांद्यावर एक स्टायलिश बॅग असून, तिच्या हातावर प्लास्टर असल्याचे स्पष्ट दिसते आहे. हे पाहून अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी तिला लवकर बरी होण्यासाठी शुभेच्छा द्यायला सुरुवात केली.

पापाराझींनी तिला विचारल्यावर ती सहज म्हणाली, “तूट गया हाथ. गिर गई तो टूट गया” सोनाली बेंद्रेच्या हाताला नक्की काय दुखापत झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, तिच्या हातावर प्लास्टर पाहून चाहते कमेंट सेक्शनमध्ये तिची विचारपूस करत आहेत. “काय झालं सोनाली मॅम?”, “लवकर बरी हो”, अशा आशयाच्या अनेक कमेंट्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
सोनाली बेंद्रे ९०च्या दशकातील बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने १९९४ मध्ये ‘आग’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि त्यानंतर अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आतापर्यंत तिने ५३ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून, तिच्या अभिनयशैलीने तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत.
हेही वाचा :
सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ योजनेअंतर्गत पात्र महिला व वृद्धांना मिळणार ‘एवढी’ रक्कम!
मुलांसमोरच दिराचा जबरदस्तीने वहिनीवर अत्याचार; पीडितेने केला अॅसिडने हल्ला…अन्…
कलाविश्वात शोककळा! ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या 48 व्या वर्षी निधन