मौल्यवान धातू सोन्याने(gold price) आज 15 डिसेंबररोजी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातु तेजीत दिसून आले. मात्र, आठवड्याच्या शेवटी किमती खाली उतरताना दिसून आल्या. जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम हा सराफा बाजारावर देखील दिसून आला. सध्या लग्न सराईचा हंगाम सरू झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळालाय.
या आठवड्यात सोन्याच्या(gold price) भावात 2 हजारांची वाढ दिसून आली. 9 डिसेंबर रोजी सोने 160, 10 डिसेंबरला 820 रुपये तर 11 डिसेंबर रोजी 870 रुपयांनी सोने महागले. तर 13 डिसेंबर रोजी सोने 600 रुपयांनी स्वस्त झाले. आज सकाळच्या सत्रात देखील सोन्याने आनंदवार्ता दिली आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,002 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
या आठवड्यात चांदीने देखील ग्राहकांना खुश केलं आहे. चांदीमध्ये 4 हजारांची मोठी घसरण दिसून आली. तर बुधवारी एक हजारांनी किंमती उतरल्या. 13 डिसेंबर रोजी चांदी 3 हजार रुपयांनी स्वस्त झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,500 रुपये इतका आहे.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,922, 23 कॅरेट 76,614, 22 कॅरेट सोने 70,461 रुपयांवर आहे. तर 18 कॅरेट आता 57,692 रुपये, 14 कॅरेट सोने 44,999 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते.
हेही वाचा :
या मूलांकांच्या लोकांची कायदेशीर अडचणीतून सुटका होण्याची शक्यता
शिवसेना फुटली, छगन भुजबळांचं बंड अन्…; 33 वर्षांनंतर आज पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार
यंदा विराट कोहली नाही तर ‘हा’ युवा क्रिकेटर बनू शकतो RCB चा नवा कर्णधार