भारतीय अंतराळवीर चंद्रावर पहिले पाऊल कधी ठेवणार?(rain)एस. सोमनाथ यांनी ISRO चा प्लान सांगितला आहे.
2040 पर्यंत भारतीय अंतराळवीराला चंद्रावर पाठवण्याचे पंतप्रधान मोदी यांचे टार्गेट आहे. भारताची मानवाला चंद्रावर पाठवण्याची मोहिम यश्वसी करण्याच्या अनुषंगाने ISRO ने कास प्लान बनवला आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून चांद्रयान-4 मिशन हाती घेतले जाणार आहे. चांद्रयान-4 बाबत ISRO चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी मोठी अपडेट दिली आहे.
चांद्रयान-4 मोहिम भारतासाठी टर्निंग पाईंट ठरणार
भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. (rain)यानंतर आता इस्रोने गगनयान मोहिमेवर लक्ष केंद्रित केले आहे. गगनयान मोहिमे अंतर्गत भारतीय अंतराळवीर चंद्रावर पहिले पाऊल ठेवणार आहेत. भारताची ही पहिली मानवी अंतराळ मोहिम कशी असेल याबाबत ISRO चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी माहिती दिली आहे. या अनुषंगाने राबलण्यात येणारी चांद्रयान-4 मोहिम भारतासाठी टर्निंग पाईंट ठरणार आहे. चांद्रयान-4 मोहिमे अंतर्गत द्रावर जाऊन नमुने गोळा करून पृथ्वीवर परत आणले जाणार आहेत.
भारतीय अंतराळवीर चंद्रावर कधी आणि कसे जाणार?
मानवी अंतराळ मोहिम राबवण्यासाठी ह्यूमन रेटेड रॉकेट्स तयार केले जाणार आहेत. गगनयान महोिम याचाच एक भाग आहे. काही दिवसांपूर्वी इस्रोनं मिशन गगनयानच्या क्रू एस्केप सिस्टमची चाचणी यशस्वी केली. इस्रोच्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन गगनयानचं क्रू मॉडेल लाँच करण्यात आलं. तांत्रिक अडचणीमुळे चाचणी थांबवण्यात आली होती. अखेर अडचणीवर मात करून मॉड्युल अवकाशात सोडण्यात आलं. त्यानंतर ठाराविक ठिकाणावरून पॅराशूटद्वारे क्रू मॉडल पुन्हा जमिनीकडे पाठवण्यात आले. त्यानंतर हे मॉड्युल समुद्रात स्थिरावलं. अंतराळवीरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठीची ही मानवरहीत चाचणी यशस्वी झालेय. यानंतर आता प्रखथ रोबोट्न अंतराळात पाठवले जाणार आहे. यानंतर प्रत्यक्षात मानवी मोहिम राबवली जाणार आहे.
2025 मध्ये गगनयान मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्याची इस्रोची योजना आहे. म्हणजेच पहिल्यांदाच भारतीय अंतराळवीर गगनयानमध्ये बसून पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पृथ्वीभोवती घिरट्या घालतील. सन 2035 पर्यंत, भारत स्वतःचे स्पेस स्टेशन तयार करेल. जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) प्रमाणे पृथ्वीभोवती फिरेल. यानंतर 2040 पर्यंत इस्रो आपले अंतराळवीर चंद्रावर पाठवण्याची तयारी सुरु करेल.
भारताचे स्वत:चे स्पेस स्टेशन
आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन आणि चीननंतर भारत जगातील तिसरे स्पेस स्टेशन बनवणार आहे. विशेष म्हणजे स्वतंत्रपणे असे करणारा भारत हा चीननंतरचा दुसरा देश असणार आहे. भारताकडून बांधल्या जाणाऱ्या स्पेस स्टेशनचे वजन 20 टन इतकं असेल. पुढच्या वर्षी भारतीय अंतराळवीराला नासा आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला पाठवणार आहे. अमेरिकेत हे ट्रेनिंग होणार आहे.
हेही वाचा :
कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान
भाजपमध्ये गेलेल्या माझ्या मुलाचा पराभव व्हावा, काँग्रेस नेते ए. के अँटोनी यांचे महत्त्वपूर्ण विधान
ऐश्वर्याचा 18 वर्षानंतर होणार घटस्फोट, कोर्टात दाखल केला अर्ज