ठाण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर(touch) आली आहे. नराधम बापच पोटच्या पोरीवर अत्याचार करत असल्याचं प्रकरण ठाण्यातील उल्हासनगरमधून समोर आले आहे. पत्नीपासून विभक्त झालेला नराधम मुलीवर अत्याचार करात होता. पोलिसांनी दिले गुड टच, बॅड टचचे धडे दिले, त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. आईच्या तक्रारीवरून पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे.

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये पोलीस एका शाळेत विद्यार्थिनींना गुड टच, बॅड टचचे धडे द्यायला गेले, ते ऐकून एका चिमुकलीला आपला बाप आपल्यासोबत दुष्कर्म करत असल्याचं उमगलं अन तिनं याबाबत शिक्षिकेला सांगताच या नराधम बापावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
उल्हासनगरात आरोपी बाप हा त्याच्या दोन (touch) मुलींसह वास्तव्याला असून त्याची पत्नी त्याच्यापासून विभक्त झाली आहे. यानंतर आपल्या मोठ्या मुलीच्या बाल अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यानं तिला वासनेची शिकार केलं होतं. अशातच या मुलीच्या शाळेत उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांकडून एका शाळेत गुड टच आणि बॅड टचची माहिती देण्यात आली. ते ऐकून या चिमुकलीला आपला बाप आपल्यासोबत दुष्कर्म करत असल्याचं उमगलं.
याबाबत तिने शिक्षिकेला माहिती दिल्यानंतर शिक्षिकेनं पोलिसांच्या मदतीनं तिच्या आईला ही बाब सांगितली. याबाबत आईने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून (touch) या नराधम बापाविरोधात पोक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. यानंतर मुलीचा ताबा आईकडे देण्यात आला असून बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या प्रकारामुळे उल्हासनगरमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
हेही वाचा :
51 वर्षांची मलायका अरोराच्या लूकनं नाही तर पोटावर सगळ्यांच्या नजरा
सिनेस्टाईल अपहरण प्रकरणी मोठी अपडेट नवऱ्याने बायकोसोबत भयकंर कृत्य का केलं
सासऱ्याला सूनेच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजलं त्यानंतर दोघांमध्ये शेतात जे घडलं