18 वर्षीय विद्यार्थ्याच्या तोंडात रुमालाचा बोळा कोंबून पोलीस कर्मचाऱ्याचे निर्घृण कृत्य; पीडिताचा धक्कादायक खुलासा!

नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या 18 वर्षीय(student) विद्यार्थ्याला एका पोलीस कर्मचाऱ्याने हॉस्टेलमध्ये बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नांदेड शहरात खळबळ उडाली आहे.

माहूर तालुक्यातील आसोली येथील प्रथमेश पुरी हा(student) विद्यार्थी नांदेडमध्ये नीट परीक्षेची तयारी करत आहे. 5 जानेवारी रोजी रात्री उशिरा, एका पोलीस कर्मचाऱ्याने आणि त्याच्या दोन साथीदारांनी प्रथमेशला हॉस्टेलमधून बाहेर काढून बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये पोलीस कर्मचारी प्रथमेशच्या तोंडात रुमाल कोंबून त्याला मारहाण करताना दिसत आहे.

पीडित विद्यार्थी प्रथमेश पुरी याने सांगितले की, “एक पोलीस कर्मचारी आला आणि रात्री 11.30 वाजता दरवाजा ठोठावला. महाराष्ट्र पोलीस आहे, तुझ्याशी बोलायचं आहे सांगून ते मला खाली घेऊन गेले. खाली नेल्यानंतर मला मारहाण करण्यात आली. मारहाण केल्यानंतर मला पाण्याच्या टाकीखाली असणाऱ्या रुममध्ये नेऊन मारहाण केली. यानंतर मित्राच्या रुममध्ये नेलं आणि तिथेही मारलं. हॉस्टेलमध्येही तिघांनी मला खूप मारहाण केली.”

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. मात्र, या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या 18 वर्षीय विद्यार्थ्याला एका पोलीस कर्मचाऱ्याने हॉस्टेलमध्ये बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नांदेड शहरात खळबळ उडाली आहे.

माहूर तालुक्यातील आसोली येथील प्रथमेश पुरी हा विद्यार्थी नांदेडमध्ये नीट परीक्षेची तयारी करत आहे. 5 जानेवारी रोजी रात्री उशिरा, एका पोलीस कर्मचाऱ्याने आणि त्याच्या दोन साथीदारांनी प्रथमेशला हॉस्टेलमधून बाहेर काढून बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये पोलीस कर्मचारी प्रथमेशच्या तोंडात रुमाल कोंबून त्याला मारहाण करताना दिसत आहे.

पीडित विद्यार्थी प्रथमेश पुरी याने सांगितले की, “एक पोलीस कर्मचारी आला आणि रात्री 11.30 वाजता दरवाजा ठोठावला. महाराष्ट्र पोलीस आहे, तुझ्याशी बोलायचं आहे सांगून ते मला खाली घेऊन गेले. खाली नेल्यानंतर मला मारहाण करण्यात आली. मारहाण केल्यानंतर मला पाण्याच्या टाकीखाली असणाऱ्या रुममध्ये नेऊन मारहाण केली. यानंतर मित्राच्या रुममध्ये नेलं आणि तिथेही मारलं. हॉस्टेलमध्येही तिघांनी मला खूप मारहाण केली.”

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. मात्र, या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा :

हर हर महादेव! शिवलिंगाला मिठी मारणाऱ्या अस्वलाचा VIDEO व्हायरल; दृश्य पाहून नेटकरी थक्क!

अनुष्का विराट अखेर झाले ‘अलिबाग’कर; लवकरच करणार गृहप्रवेश

शर्टाची कॉलर उडवतो म्हणून तरुणाचा गळा चिरला, घरात घुसून केला हल्ला