पाऊस असेल त्या ठिकाणची पोलीस भरती प्रक्रिया रद्द; गृहमंत्री फडणवीसांची घोषणा

मुंबई : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. त्याचवेळी राज्यात दुसरीकडे पोलीस भरती(recruitment) सुरु आहे. या मुसळधार पावसाचा फटका पोलीस भरतीला बसताना दिसत आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील नांदेड आणि अमरावती ग्रामीण पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी या पोलीस भरतीबाबत महत्वाची माहिती दिली. राज्यात जिथे पाऊस तिथे पोलीस भरती पुढे ढकलली आहे, असे गृहमंत्री देवेंद्र फडवीस यांनी सांगितले.

राज्यातील काही ठिकाणी पोलीस भरती(recruitment) प्रक्रिया रद्द झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठं भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, राज्यात ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे. तिथे चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. पाऊस पुढे वाढणार आहे, त्यानंतर आचारसंहिता लागेल. त्यामुळे चाचणी पुढे गेली आहे.

‘मुलांचे वय निघून जाईल. त्यानंतर त्यांना दुसरी संधीही मिळत नाही. त्यात मुले घरी चालले आहेत. त्यांच्यासाठी फारशा व्यवस्था नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी मंगल कार्यालय व्यवस्था करायला सांगितले आहे’, असे त्यांनी जूनमध्ये पोलीस भरती घेण्यावर भाष्य केलं.

नव्या प्रकल्पाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, ‘इफेक्टिव्ह आणि इफिशियंट कामासाठी एक प्रकल्प तयार करत आहे. यात एक कंपनी सरकारने तयार केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कायदा आणि सुव्यवस्था करता, तसेच गुन्हा झाल्यास सोडवणे करता येणार आहे. त्याचे मॉड्युल तयार केले होते, त्याचे सादरीकरण आज झाले. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित केला जाईल.

‘प्रकल्पामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हेगारीची माहिती काढणे, सीसीटीव्ही तपासणी, नंबर प्लेट ओळखणारा कॅमेरा नसला तरी याच्या माध्यमातून शोधून काढू शकतो. काही महिने लागतात, ते काही मिनिटात शोधता येईल. वाहतूक नियोजनात फायदा होईल. या प्रकारचे मॉड्युल तयार करून सर्व युनिट्स इंटिग्रेड करणे सोपे होईल. आपण सर्वात आधुनिक सायबर केंद्र तयार केले आहे. लवकरच ते कार्यान्वित होईल. त्यामुळे देशात सर्वात सशक्त पोलीस दल आपलं असेल, अशीही फडणवीस यांनी सांगितली.

हेही वाचा :

 …तर दुर्गेचा अवतार धारण करणार, ओबीसी महिला एकवटल्या, टायर पेटवत ‘रास्ता रोको’

एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश?; अधिकृत प्रतिक्रियाही दिली

मुकेश अंबानींच्या डिपफेक व्हिडिओचा वापर करुन 7 लाखांची फसवणूक