पोलिसांचे(police) कर्तव्य कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे रोखणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षितता निर्माण करणे हे असते. महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस अधिकारी देखील तैनात असतात. परंतु, रक्षकांनीच त्रास दिल्यास दाद कोणाकडे मागायची? असा प्रश्न उपस्थित करणारी एक घटना समोर आली आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पोलीस(police) उपनिरीक्षक त्याच्याच पत्नीचा भररस्त्यात छळ करताना दिसत आहे. पोलिसांचा गणवेश घातलेला हा मद्यधुंद पुरुष एका महिलेला त्रास देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पुरुष उपनिरीक्षक असून पीडित महिला त्याची पत्नी आहे. या घृणास्पद कृत्यामुळे पोलीस विभागाने उपनिरीक्षकाला तात्काळ निलंबित केले आहे.
ही घटना उत्तर प्रदेशातील कासगंज येथे घडली. हा उपनिरीक्षक कासगंज पोलिसात कार्यरत आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
क्या ये सच है @Uppolice ? pic.twitter.com/Azf6GqSXC4
— Dimpi (@Dimpi77806999) February 20, 2025
व्हिडिओमध्ये उपनिरीक्षक त्याच्या पत्नीला तिच्या संमतीशिवाय स्पर्श करताना आणि तिला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. बसस्टॉपवर घडलेली ही घटना पाहून त्याची पत्नी अस्वस्थ आणि घाबरलेली दिसत आहे. व्हिडीओ काढला जात असल्याचे लक्षात येऊनही तो थांबत नाही. तो नशेत धुंद असल्याचेही व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
हा व्हिडिओ एका एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, “युपी पोलिस हे खरे आहे का?” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. या व्हिडिओमुळे पोलिसांच्या प्रतिमेला धक्का बसला असून, लोकांकडून तीव्र टीका होत आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी; आठवा हफ्ता आजपासून खात्यात जमा होणार
सौरव गांगुलीच्या कारचा अपघात; लॉरीनं धडक दिली अन्…
Google Pay युझर्सना मोठा दणका! आता फ्री काहीच नाही