पोलीस कर्मचारी करत होते डान्स; तितक्यात वरिष्ठ अधिकरी आले अन्…Video

सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडीओ(dance near me) पाहायला मिळतात जे आश्चर्यचकित करतात. तर कधी खूप विचित्र व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत, सामान्य नागरिकांपासून सरकारी अधिकारी देखील सोशल मीडियावर रील्स बनवताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पोलीस कर्मचाऱ्यांचा आहे.

सहसा लोक पालिसांना घाबरतात. पण अनेकदा त्यांचा असा चेहरा(dance near me) पाहायला मिळते की, आश्चर्य वाटते. पोलिस कर्मचारी देखील आपल्या प्रमाणे मनुष्य आहेत. त्यांना देखील एखाद्या गोष्टीचा आनंद घेण्याचा अधिकार आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून असे वाटते की, हा एखाद्या मालिकेचा भाग असेल किंवा व्हिडीओ मनोरंनासाठी बनवला असेल.पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक पुरूष कर्मचारी महिला सहकाऱ्यासोबत हरियाणवी गाण्यावर डान्स करत आहे. दोघेही आपापल्या नादात मग्न. महिला पोलीस कर्मचारीही नाचण्याचा आनंद घेत आहे. तेवढ्यात मागून एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आत येतात. ते थोडावेळ दोघांकडे पाहतात. तेवढ्यात महिला कर्मचारीचे लक्ष जाते.

अधिकाऱ्याला पाहताच पोलीस महिला नाचायला विसरते. तिच्या चेहऱ्यावरून आनंद नाहीसा होतो. ती हळूच घाबरून दुसऱ्या सहकर्मचाऱ्याला थांबवते. तो देखील सिनियरला पाहून डान्स करत थांबतो. आणि दोघे वरिष्ठ अधिकाऱ्याला सलाम करतात. पण नंतर असे काही घडते ज्याचा कोणी विचारही केला नसेल. पोलिस अधिकारी त्याच्या दोन कनिष्ठांच्या मध्ये पुढे येतो आणि गाण्यावर जोमाने नाचू लागतात. हे पाहून ते कर्मचारी देखील डान्स करू लागतात.

हा व्हिडिओ आतापर्यंत 80 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर लाखो लोकांनी लाईक आणि शेअर केले आहेत. हजारो कमेंट्स केल्या आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने म्हटले आहे की, ‘हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आज पहिल्यांदाच मी पोलिसांवर हसलो.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘असे पोलीस आणि पोलीस स्टेशन असतील तर गुन्हेगारांना मजा येईल.’ तर आणखी एकाने लिहिले आहे की, ‘हे इंस्टाग्रामचे युग आहे, सर्वांना नाचायला लावत आहे.’

हेही वाचा:

अल्पवयीन मुलावर दोघांकडून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

टीम इंडियात ‘या’ पाच दिग्गजांसाठी दरवाजे बंद, आयपीएल मध्येही ‘गेम ओव्हर’

सप्टेंबरमध्ये करा बॅग पॅक! शिर्डी..अहमदाबाद..हरिद्वार.. सुरू होणार भारतीय रेल्वेचे ‘हे’ 3 टूर पॅकेज