कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : अजित दादा पवार गटाचे आमदार(political articles) अमोल मिटकरी विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वादात आता वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची एन्ट्री झाली आहे. चिल्लर (मिटकरी) लोकांच्या गाड्या कशाला फोडता? फोडायचा असतील तर शरद पवारांच्या, देवेंद्र फडणवीस यांच्या, उद्धव ठाकरेंच्या गाड्या फोडा! असा अनाहूत सल्ला आंबेडकर यांनी दिला आहे. त्यांचे जाहीर सभेतील हे आवाहन कार्यकर्त्यांना गुन्हा करण्यास प्रवृत्त करणारे ठरू शकते. त्याची दखल पोलीस प्रशासन घेईल किंवा घेणारही नाही. गेल्या तीन-चार दिवसांपासून गाजत असलेल्या, वाजत असलेल्या या प्रकरणाने 29 वर्षापूर्वीच्या रमेश केनी यांच्या संशयास्पद मृत्यूची घटना पुन्हा चर्चेत आली आहे.
अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड होत असताना मनसेचा जय मोलाकार(political articles) हा कार्यकर्ता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मरण पावला. आता त्याच्या मृत्यूची जबाबदारी एकमेकांवर टाकली जात आहे. हे प्रकरण गंभीर पातळीवर आल्यानंतर आमदार मिटकरी यांनी जय मुलाकार हा अजितदादा पवार गटात प्रवेश करणार होता. त्याचा राग मनात ठेवून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी त्याचा गेम केला असावा. म्हणून त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी रमेश खेळणी यांच्या गूढ मृत्यूचा दाखला दिला आहे. एकूणच अमोल मिटकरी यांच्याकडून राईचा पर्वत त केला जातो आहे किंवा सूतावरून स्वर्ग गाठण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो आहे. रमेश केणी आणि जय मोलाकार या दोन्ही घटना पूर्णतः वेगवेगळ्या असूनही या दोन घटनांचा परस्परांशी संबंध जोडण्यामागे”संशय”निर्माण करणे हा त्यांचा हेतू असावा.
रमेश केणी हे प्रकरणच आजच्या पिढीला माहीत असण्याची शक्यता फारच कमी आहे. इसवी सन 1995 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार आले. शिवसेनेचे मनोहर पंत जोशी हे मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. तेव्हा पुणे येथील एका चित्रपटगृहात रमेश केणी हे मुंबईचे गृहस्थ मृतावस्थेत आढळले. मुंबईच्या व्यक्तीचा पुण्यातील चित्रपटगृहात मृतदेह कसा आढळतो? याबद्दल तेव्हा प्रिंट मीडियाने शंका व्यक्त केली होती. त्यानंतर या गूढ मृत्यूशी राज ठाकरे यांच्याशी संबंध लावला गेला.
ठाकरे आणि केणी या दोघांमध्ये मुंबईतील एका मालमत्तेसंबंधी वाद होता आणि या वादातून त्यांची हत्या झाली अशी चर्चा तेव्हा रंगू लागली. त्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार आले. या सरकारमध्ये छगन भुजबळ हे गृहमंत्री होते. त्यांनी रमेश केणी गूढ मृत्यूचा पुन्हा तपास सुरू केला. भुजबळ यांनी हे प्रकरण केव्हा फारच लावून धरले होते. अर्थात पोलीस तपासातून काहीही निष्पन्न झाले नाही. राज ठाकरे यांच्या भोवतीचे संशयाचे वातावरण दूर झाले. आता हे 29 वर्षांपूर्वीचे प्रकरण अमोल मिटकरी यांनी पुन्हा चर्चेत आणले आहे. आणि त्याला जय मोलाकार याच्या मृत्यूचा संबंध जोडला आहे.
एकूणच सुपारीबाज या शब्दावरून सुरू झालेला वाद आता रमेश केणी प्रकरणापर्यंत पोहोचला आहे.
या दोघांच्या वादात वंचित चे प्रकाश आंबेडकर यांनी एन्ट्री करून आमदार अमोल मिटकरी यांना चिल्लर असे
संबोधले आहे. एवढ्यावरच ते थांबलेले नाहीत तर चिल्लर लोकांच्या गाड्या कशाला फोडता? असा सवाल करून त्यांनी शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे या मोठ्या नेत्यांच्या गाड्या फोडा असा सल्ला नव्हे तर चिथावणी दिली आहे. प्रत्यक्षात असे काही होणार नसले तरी त्यांच्या या चिथावणीची दखल गृहमंत्रालयाने घेतली पाहिजे. पण तसेही घडेल असे नाही.
हेही वाचा :
देशभरातील अस्मानी संकट: वायनाडनंतर हिमाचलमध्ये 47 लोक बेपत्ता
“ऑक्टोबरमध्ये सरकारची संभाव्य पडझड: प्रमुख नेत्याची चेतावणी”
रस्ते अपघातग्रस्तांसाठी केंद्र सरकारची नवी योजना: नितीन गडकरींची मोठी घोषणा