गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील राजकीय(political) वर्तुळातील हालचालींना वेग आला आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातही काही उलाढाली सुरू आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये केंद्रातील राजकीय वर्तुळातही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. अशातच पंढरपूरमध्ये बोलताना बच्चू कडूंनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार भाजपसोबत जाणार असल्याचा दावा आहे. उद्धव ठाकरे आणि शरग पवार केंद्रात नरेंद्र मोदी यांच्यासोबत युती करू शकता, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
बच्चू कडू म्हणाले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू एक-दोन बील पास करण्यासाठी भाजपसोबत थांबले आहेत. ते गेल्यानंतरची सोय भाजप बघत आहे. त्यामध्ये शरद पवार(political) आणि उद्धव ठाकरे यांच्या खासदारांची सोय राहता संजय राऊत यांच्या वक्तव्यातून हेच दिसत आहे. त्यामुळे आता आपल्याकडे पुन्हा सत्ता येणार असल्याने कोणी पक्ष सोडून जाऊ नये, हाच संजय राऊत यांचा प्रयत्न आहे.
एक रुपयाच्या पीक विमा योजनेवरून बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव यांच्यावर कडाडून टीका केली. “अजित पवार म्हणतात, माहिती नाही, आणि माणिकराव म्हणतात, बजेट नाही,” असे म्हणत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार असल्याच्या बातम्या समोर आल्यावर बच्चू कडू भडकले. “बॅटगे तो कटेंगे म्हणणारे लोक दिव्यांग हिंदू नाहीत का?” असा सवालही त्यांनी यावेळी केला. महाराष्ट्रातील निवडणूक निकालांवर भाष्य करताना ते म्हणाले, “मागील काळात फक्त काही मोजक्या लोकांनाच 50 ते 70 हजारांच्या लीडने विजय मिळायचा. पण आता कुणालाही एक लाखाच्या लीडने विजय मिळतोय. हा एकाएकी फरक कसा पडला?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा :
सैफ अली खानवर आणखी एक संकट, सरकार करणार कारवाई
१० लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार? अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता
कृषी विभागाचा सल्ला ऐकला अन् शेतकरी मालामाल झाला…