कोल्हापुरात ‘राजकीय’ शर्यत! संजय मंडलिकांसाठी धनंजय महाडिकांनी लावली तब्बल ५ कोटींची पैज

कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक(political news) यांच्या वादग्रस्त विधानाने राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच आता भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी लावलेल्या ५ कोटींच्या पैजेची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदार(political news) संघात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती आणि महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये लढत होणार आहे. संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी खासदार धनंजय महाडिक मैदानात उतरले आहेत. याचवेळी चंदगड इथल्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी संजय मंडलिकांना सर्वाधिक लीड देणाऱ्या तालुक्याला ५ कोटींचा निधी देण्याची पैज लावली आहे.

संजय मंडलिक यांना निवडून देण्यासाठी कागल आणि चंदगड या दोन्ही तालुक्यामध्ये ही शर्यत लावली असून सर्वाधिक लीड देणाऱ्या तालुक्याला 5 कोटी रुपयांचा अधिकचा निधी देणार असल्याचा शब्द धनंजय महाडिक यांनी दिला आहे.

संजय मंडलिक निवडून आल्यानंतर ज्या तालुक्यातून जास्त लीड पडेल त्या तालुक्याला धनंजय महाडिक आणि संजय मंडलिक यांच्या निधीतील अडीच अडीच कोटी रुपयांचा अधिकचा निधी देण्याची घोषणा या सभेतून धनंजय महाडिक यांनी केली. सध्या त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य (12-04-2024)

ब्रेकअप करण्यापूर्वी या ५ गोष्टी लक्षात ठेवा, नात्यातील दूरावा होईल कमी

नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; खासगी कंपन्यांमध्येही होणार भरघोस पगारवाढ?