मांगी येथील तलावात कुकडीचे पाण्यावरून(water) राजकारण चांगलंच रंगलेले दिसून आलं. पण विरोधी गटाऐवजी मित्र पक्षांमध्येच जुंपलेले चित्र समोर आले आहे. तालुक्यात नुकतेच कुकडीचे पाणी दाखल झाले व त्यावरून श्रेय घेणाऱ्या भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांना शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षांनी झोडपले आहे. “ओव्हर फ्लो पाण्याने तलाव भरला त्यात आपले योगदान काय ?” असा सवाल केला आहे. यामुळे महायुती मधील धुसपुस चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.
करमाळा तालुक्यात महायुतीमध्ये विद्यमान आमदार संजयमामा शिंदे अपक्ष जरी असले तरी ते अजितदादा यांचे समर्थक म्हणून परिचित आहेत. तर नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले दिग्विजय बागल या दोघांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुकडीत आलेल्या पाण्यावरून(water) श्रेय घेताना दिसून आले. या संदर्भात बागल यांनीही मागणी केली होती त्यामुळे दिग्विजय बागल आज (गुरुवारी) पाणी पूजन करणार आहेत. तर शिंदे गटाचे समर्थक सुजित बागल यांनी सर्व श्रेय विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचे असल्याचे सांगितले आहे. यावरून विरोधी गटाऐवजी महायुतीतीलच महत्त्वाचा घटक असलेले शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष महेश चिवटे यांनीच दोघांवरही टीका केली आहे.
यामुळे दुरून जरी महायुतीमध्ये सर्वकाही अलबेल दिसत असलं तरी अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर येऊ लागली आहे. बऱ्याच वेळा उघड भाषणांमध्ये भाजपा नेते दिग्विजय बागल यांनी रश्मी बागल यांना आमदार करण्याची भाषा बोलून दाखवली आहे. तर विद्यमान आमदार संजयमामा शिंदे हे अजितदादा गटाचे निकटवर्तीय असल्याने त्यांचेही महायुतीच्या उमेदवारीचे दावेदारी दिसून येते. त्यात मागील काळापासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या करमाळा तालुक्यातील मतदारसंघावर शिवसेनेचा हक्क असल्याचे सांगणारे शिवसेना जिल्हाध्यक्ष महेश चिवटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी करमाळ्याची जागा शिवसेनेला सुटणार असल्याचे बोलले आहे. त्यामुळे तीनही गट सध्या उमेदवारीसाठी आपली ताकद पणाला लावण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत पक्षासमोर उमेदवारीवरून सर्वच पदाधिकारी आमने-सामने येऊ शकतात.
विद्यमान आमदार असलेल्या पक्षाला सहकार्य करण्याचा फॉर्मुला महायुतीचा ठरलेला असल्याने जवळपास संजयमामा शिंदे यांना महायुतीचे उमेदवारी मिळू शकते. पण पारंपारिक विरोधक असलेले बागल गट नुकतेच भाजप तसेच महायुतीमध्ये गेल्यामुळे ते स्वतः रेस मध्ये आहेत. बागल शिंदे यांच्यासोबत जुळवून घेतात का याकडे लक्ष लागून राहिले असतानाच शिवसेना शिंदे गटाने करमाळाच्या जागेवर दावा केल्याने यामध्ये वेगळीच रंगत निर्माण झाली आहे. दावा करणारे जिल्हाध्यक्ष महेश चिवटे यांची थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळीक असल्याने तेही मोठे प्रबळ दावेदार दिसून येत आहेत.
हेही वाचा:
शिवसेना अन् राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण; ‘या’ दिवशी ‘सर्वोच्च’ सुनावणी
‘शाहिद कपूरशिवाय मी…’; 17 वर्षांनी करिनाने ब्रेकअपबद्दल केला मोठा खुलासा
शेतकऱ्यांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा, भरसभेत दिलं आश्वासन