खातेनाट्याला पुन्हा सुरुवात, गृहखात्याच्या बदल्यात शिंदेंसमोर भाजपाकडून ‘हे’ 3 पर्याय?

5 डिसेंबररोजी महायुती सरकारचा शपथविधी(politics) सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आहेत. तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीये. यानंतर सर्वांचं लक्ष आता मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागलं आहे. महायुतीत अजूनही काही खात्यांवरून रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जातंय. त्यातच एकनाथ शिंदे यांना गृह खातं मिळणार की नाही, यावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे.

महायुतीत भाजप(politics) हा मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला सर्वाधिक 132 जागांवर यश मिळालं आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याला जास्त खाती जाणार, असंही म्हटलं जातंय. त्यातच गृह विभागासाठी शिंदे सेना अजूनही आग्रही असल्याचं समजतंय. तर, भाजप याबाबत तयार नाही. शिंदे यांना त्या तोडीचे एखादे खाते देण्याचा भाजपाचा प्रस्ताव आहे.

गृहखात्याऐवजी भाजपाकडून एकनाथ शिंदे यांना तीन पर्याय देण्यात आल्याची माहिती आहे. या तीन पैकी एकाची निवड शिंदे सेनेला करावी लागणार आहे. महसूल, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभाग या खात्यांचा पर्याय शिंदे यांना देण्यात आल्याची माहिती आहे. तर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 7 कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्य मंत्रीपद मिळणार असल्याचं कळतंय. याबाबत अजित पवार यांच्या निवासस्थानी एक बैठक देखील झाली.

राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, अनिल पाटील, माणिकराव कोकाटे, संजय बनसोडे, दत्तामामा भरणे, इंद्रनील नाईक आणि संग्राम जगताप यांचे नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत.

राज्यात एकूण 43 मंत्रिपद आहेत आणि महायुतीच्या आमदारांचे संख्याबळ हे 230 इतके आहे. यामध्ये भाजपकडे सर्वाधिक 132 जागांचे संख्याबळ आहे. तर राष्ट्रवादीपेक्षा आमच्याकडे अधिक संख्याबळ असल्याची चर्चा शिवसेना शिंदे गटात सुरू झाल्याचं समोर आलंय. येत्या 11 किंवा 12 डिसेंबररोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. आता यात कोणत्या पक्षाचे किती मंत्री शपथ घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे

हेही वाचा :

आठवड्याच्या शेवटी गुड न्यूज; तब्बल ‘इतक्या’ हजारांनी सोनं झालं स्वस्त

हिंदुत्ववादावरून ठाकरे गट-कॉँग्रेसमध्ये जुंपली, ट्वीटरवर मोठा राडा

व्हॉट्सॲप कॉल वरून काढता येतं तुमचं लोकेशन; पटकन बदला ही सेटिंग, नाहीतर होईल पश्चाताप