इचलकरंजी : नुकतेच भाजपा(political) मध्ये प्रवेश केलेले आमदार प्रकाश आवाडे यांचे आजपर्यंतचा राजकीय प्रवास आणि आर्थिक सत्ताकेंद्र हे केवळ आणि केवळ राष्ट्रीय काँग्रेसच्या कृपेनेच उभे राहीले आहे, हे वास्तव आहे.
गेल्या ५ वर्षापासून भाजपमध्ये(political) प्रवेश मिळावा म्हणुन पुढार्यांची दारे पुजून कोणी लाचारी केली? हे कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे. असे असताना आमदार आवाडे काँग्रेसला लाचार म्हणून टिका करत आहेत. वास्तविक काँग्रेसला लाचार म्हणणारे आमदार आवाडे हेच खरे लाचार आहेत, असा टोला काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी पत्रकाद्वारे लगावला आहे.
बावचकर म्हणाले, 1995 पासून 2024 पर्यंत आमदार आवाडे यांनी7 वेळा काँग्रेसच्या हात या चिन्हावर निवडणुक लढवली. त्यावेळी त्यांना 370 कलम किंवा 35 ए का आठवले नाही ? वस्तुतः स्वतःचे पाप झाकण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असुन त्याला राष्ट्रीय प्रश्नांची जोड देऊन आपण कसे राष्ट्रीय विचारांचे, हिंदुत्ववादी आहोत हे दाखवून देण्याचा त्यांचा केवीलवाणा प्रयत्न सुरु आहे.
आमदार आवाडे जम्मु काश्मीरमधील लाल चौकात फडकलेल्या तिरंग्याबद्दल बोलतात पण नागपुरच्या रेशीम बागेतील मातृसंस्थेवर स्वातंत्र्यानंतर 53 वर्षेे तिरंगा फडकत नव्हता, त्याबद्दल बोलायचे धाडस दाखऊ शकतात का? असा सवालही बावचकर यांनी उपस्थित केला आहे. केवळ स्वतःच्या सोयीचे व स्वार्थाचे असेल तेवढेच बोलायचे हा आमदार आवाडे यांचा उद्योगच आहे.
गेल्या ५ वर्षात भाजपमध्ये प्रवेश मिळावा म्हणुन भाजप पुढार्यांची दारे पुजून कोण लाचारी केली ? हे सर्व जनतेला माहीत आहे. त्यामुळे काँग्रेसला लाचार म्हणणारे आमदार आवाडे यांनी काँग्रेसवर आरोप करताना आपला पूर्व इतिहास आठवला तरी बरे झाले असते .
आमदार आवाडे यांच्या एकूणच भूमिकेबाबत पाहिले तर सद्या त्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशीच झाली आहे राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश करूनही स्थानिक आणि जिल्हा पातळीवरील एकही नेता त्यांना किंमत देत नाही त्यामुळे सैरभैर होऊन त्यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे.
आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपात प्रवेश केला आहे मात्र पक्षात त्यांना कोणते स्थान आहे हे त्यांनी अद्याप स्पष्ट केले नाही .काँग्रेसवर टीका करून भाजपामध्ये आपण किती एकनिष्ठ आहोत हे दाखवून देण्यासाठी त्यांचा हा खटाटोप आहे असे एकंदरीत दिसून येते.
हेही वाचा:
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या मुलीचा अपघात
५०० च्या नोटेवर गांधींजींचा नाही तर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा फोटो
इचलकरंजी पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीची मोठी पावले: कॅबिनेटने तीन सीईटीपी प्लांट्ससाठी ५२९ कोटींची मंजुरी दिली