मान्सून राज्यात(Monsoon) येण्यासाठीचा काऊंटडाऊन सुरु झाला असून, बहुतांश भागांमध्ये पूर्वमोसमी पावसासाठी पूरक वातावरण होताना दिसत आहे.
जून महिन्याची सुरुवात झाल्या क्षणापासून पावसाचं आगमन कधी होणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उकाडा कमी होण्याचं नाव घेत नसल्यामुळ आता सूर्याचा प्रकोप असह्य होताना दिसत आहे. पुढील 24 (Monsoon)तासांच्या हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या मान्सूनचं आगमन झालं नसलं तरीही मान्यूनच्या आगमनासाठीचं पोषक वातावरण मात्र तयार होताना दिसत आहे. ज्यामुळं कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या पूर्व भागात सोमवारी (3 जून 2024) रोजी वादळी पावसाची हजेरी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांमध्ये पावसाचा यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! ‘या’ राज्यात पान मसाल्यासह तंबाखूच्या विक्रीवर बंदी, नियम मोडल्यास तुरुंगात रवानगी
देशात येणार इंडिया आघाडीचे सरकार, संजय राऊत यांनी सत्ता स्थापनेचा दिला असा आकडा