युजवेंद्र चहल ठरला केकेआरविरुद्ध जायंट किलर, प्रीती झिंटाने मारली ‘आनंदाची मिठी’, व्हिडिओ व्हायरल

आयपीएल २०२५ मध्ये ३१ सामने खेळले गेले आहेत. काल मंगळवार रोजी(१५ एप्रिल) झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सवर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. पंजाब किंग्जने हा रोमांचक सामना(match) १६ धावांनी जिंकला आहे. या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद केवळ १११ धावा केल्या. केकेआरच्या गोलंदाजासमोर पंजाबचे फलंदाज काही करू शकले नाही.

तसेच पंजाबच्या गोलंदाजांनी देखील पलटवार करुन केकेआरच्या संघाला ९५ धावांवरच रोखले आणि पंजाबने विजय खेचून आणला. या सामन्यात(match) युजवेंद्र चहलने चांगली कामगिरी करत सर्वाधिक ४ बळी घेतले. विजयानंतर प्रीती झिंटा संघासोबत सामना जिंकल्याचा आनंद व्यक्त करताना दिसून आली आहे. झिंटाने आनंदाने युजवेंद्र चहलला मिठी मारली आणि हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात पार पडलेला सामना हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येच्या सामन्यांपैकी एक होता. हा सामना खूपच रोमांचक असा झाला. पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करत १११ धावा केल्या, त्यानंतर असे वाटले की सामना पंजाब किंग्जच्या हातून गेला आणि केकेआर सहज जिंकेल परंतु पंजाब किंग्जने सामन्यात पुनरागमन करत कोलकाता नाईट रायडर्सना ९५ धावांवरच गारद केले.

सामन्यात मिळत गेलेल्या प्रत्येक विकेटवर प्रीती झिंटा आनंदाने नाचताना दिसत होती. पंजाब किंग्जने सामना जिंकताच संघाची मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आनंदाने नाचली. विजयानंतर ती मैदानावर पोहोचली आणि संघाचा जयजयकार करू लागली, त्याच दरम्यान युजवेंद्र चहल तिथे आला आणि त्याला प्रीती झिंटाने आनंदाने मिठी मारली.

पंजाब किंग्जने दिलेल्या ११२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कोलकाताचा संघ ९५ धावांवरच गारद झाला. या कमी धावसंख्येच्या सामन्यामध्ये युजवेंद्र चहलने २८ धावा देऊन सर्वाधिक ४ गडी बाद केले. या कामगिरीने चहल विजयाचा शिल्पकार ठरला. यासह, युजवेंद्र चहलने आयपीएलच्या इतिहासात 8 वेळा चार विकेट घेण्याचा विक्रम देखील केला आहे. या बाबतीत त्याने कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकी गोलंदाज सुनील नारायणशी बरोबरी साधली आहे. सुनील नरेनने देखील त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ८ वेळा चार विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आही.

हेही वाचा :

नीना गुप्ता यांनी स्वतःच्या ब्रेस्टबद्दल केली अशी कमेंट, लोकांनी कान बंद केले

कुस्तीविश्वात खळबळ! शिवराज राक्षेला न्याय, कुस्ती महासंघाने घेतला मोठा निर्णय

भिडेनां चावणाऱ्या कुत्र्याची एसआयटी चौकशी करा