सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना (prepare)पडतो. अशावेळी बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. सकाळच्या वेळी पोटभर नाश्त्यात केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. सकाळी नाश्ता करणे ही आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगली सवय आहे. त्यामुळे नेहमी घराबाहेर जाताना पोटभर नाश्ता करूनच बाहेर जावे. यामुळे शरीरात थकवा किंवा अशक्तपणा जाणवत नाही. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये काकडी पोहे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. काकडी पोहे बनवणे अतिशय सोपे आहे. कमीत कमी वेळात झटपट हा पदार्थ तयार होतो. शिवाय तुम्ही बनवलेले पोहे घरातील सगळ्यांना नक्की आवडतील. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
साहित्य:
- पोहे
- काकडी
- मीठ
- किसलेलं खोबरं
- चणा डाळ
- उडीद डाळ
- शेंगदाणे
- हिरवी मिरची
- कढीपत्ता
- तेल
कृती:
- काकडी पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम, (prepare)पोहे स्वच्छ धुवून घ्या. ५ मिनिटं पोहे पाण्यात भिजवून नंतर त्यातील पाणी काढून घ्या.
- मोठ्या भांड्यात भिजवून घेतलेले पोहे, किसलेली काकडी आणि ताजे किसलेले खोबरं मिक्स करून घ्या.
- फोडणीच्या भांड्यात तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात हिरवी मिरची, जिरे, मोहरी, शेंगदाणे, उडीद डाळ, चणा डाळ आणि भरपूर कढीपत्ता टाकून फोडणी गरम करून घ्या.
- त्यानंतर तयार केलेली फोडणी पोह्यांमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर वरून चवीनुसार मीठ आणि साखर टाकून मिक्स करून घ्या.
- तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये (prepare)बनवलेले काकडी पोहे.
हेही वाचा :
समोर मोठी बोट दिसत असतानाही स्पीड बोट कशी धडकली?
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका