गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, आणि बाप्पाच्या (ganpati)स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. या खास प्रसंगी बाप्पाला आवडणारे मोदक तयार करण्याची परंपरा प्रत्येक घरात पाहायला मिळते. यंदा बाप्पासाठी गॅसचा वापर न करता ‘नो कुक’ नारळ आणि मावा मोदक तयार करून तुम्ही काहीतरी अनोखं आणि चविष्ट बनवू शकता.
हे मोदक बनवण्यासाठी तुम्हाला फक्त काही सोपी आणि पौष्टिक सामग्री लागणार आहे. विशेष म्हणजे या मोदकांची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल, आणि बाप्पालाही प्रसादासाठी हे मोदक अर्पण करता येतील. चला तर जाणून घेऊया या ‘नो कुक’ मोदकाची सविस्तर रेसिपी आणि लागणारे साहित्य.
साहित्य:
- २ कप खवलेला नारळ
- १ कप मावा (खवा)
- १ कप साखर
- १ टीस्पून वेलची पूड
- सजावटीसाठी बदाम-काजूचे तुकडे
कृती:
- खवलेला नारळ, मावा, आणि साखर एका मोठ्या भांड्यात एकत्र करा.
- या मिश्रणात वेलची पूड घालून सर्व व्यवस्थित मिक्स करा.
- तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून मोदकाच्या साच्यात ठेवा आणि मोदक तयार करा.
- प्रत्येक मोदकावर बदाम-काजूचे तुकडे लावून सजवा.
यंदा बाप्पासाठी हे झटपट आणि स्वादिष्ट मोदक तयार करून उत्सव साजरा करा!
हेही वाचा:
‘महायुतीत असलो तरी मुख्यमंत्रीपदासाठी लढाई सुरूच’: अजित पवारांची स्पष्ट भूमिका जागावाटपावर
सांगलीतील कदमांच्या मेळाव्याकडे ठाकरे गटाची पाठ फिरवली..