सांगलीत काँग्रेसप्रेमी कार्यकर्ता मेळाव्याला विशाल पाटलांची उपस्थिती, चर्चांना उधाण

सांगली: सांगलीत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रेमी(workers) कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवार राहिलेले विशाल पाटील यांच्यासाठी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी झटून काम केल्याने आणि विशाल पाटील यांच्या विजयाच्या आशा असल्याने या स्नेहमेळावाचे आयोजन केल्याचे बोलले जात आहे. तसेच या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून आगामी काळात पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकात एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

या स्नेहमेळाव्यात काँग्रेसचे नेते आमदार(workers) विश्वजित कदम, लोकसभेचे उमेदवार विशाल पाटील, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सांगली शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटी कडून या स्नेहमेळाव्याचे बायपास रोडवरील एका लॉनमध्ये आयोजन करण्यात आले होते. या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

सांगलीमध्ये दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्नेहभोजनासाठी काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आणि याच स्नेहभोजनासाठी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी देखील उपस्थित लावली.

विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या स्नेहभोजनासाठी उपस्थिती लावल्याने आता सांगलीत चर्चांना उधाण आलेय. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात विश्वजीत कदम हे कोणाच्या बाजूने आहेत हे चार जून रोजी कळेल, असे विश्वजीत कदम यांनी थेट सांगितले होते. त्यामुळे सांगलीतील काँग्रेसने नेमके कोणाचे काम केले हे पहावे लागणार आहे.

सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याने महाविकास आघाडीने येथून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती. याविरोधात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भूमिका घेतली होती. स्थानिक काँग्रेसने विशाल पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी केली होती. परंतु, उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे सांगलीची लढाई विशाल पाटील Vs चंद्रहार पाटील Vs संजयकाका पाटील अशी तिरंगी झाली होती.

हेही वाचा :

पुणेकरांचा उद्रेक! मस्तवाल बिल्डरवर शाई फेकली

आज तुमच्या यादीत ठेवा ‘हे’ 10 शेअर्स; देतील जबरदस्त परतावा

मोदी सरकारपुन्हा हात पसरलेरिझर्व्हबँकेकडून 2.11लाख कोटीसरकारच्तिजोरीत