बेरोजगारी रोखण्यासाठी मोदी-योगींनी एकही मुल…; खासदाराचा व्हिडिओ डीपफेक असल्याचा भाजपचा दावा

भाजपचे आझमगडचे खासदार दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ यांचा एक व्हिडिओ(deep fake video free) सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झालाय. भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालविया यांनी काँग्रेसवर यासंदर्भात आरोप केले आहेत. काँग्रेस डीपफेक व्हिडिओ वापरत असून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं ते म्हणाले आहेत.

व्हिडिओमध्ये(deep fake video free) दिनेश लाल यादव उर्फू निरहुआ म्हणताना दिसत आहेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुलांना जन्म न घालण्याचा निर्णय घेऊन बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप नेत्याच्या या वक्तव्याचा व्हिडिओ काँग्रेस नेत्याने एक्सवर शेअर केला होता.

अमित मालविया यांनी सांगितलं की, व्हिडिओ हा डीपफेक आहे. तसेच याप्रकरणी काँग्रेसचे नेते श्रीनिवास बीव्ही यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमित मालविया यांनी एक्सवर पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

मालविया म्हणालेत की, व्हिडिओ डीपफेक आहे. काँग्रेस लोकांची दिशाभूल करण्यासाठी फेक व्हिडिओ शेअर करत आहे. लोकांमध्ये अशांतता आणि फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यादव याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करतील. श्रीनिवास बीव्ही वारंवार असं कृत्य करत आहेत. आमच्याकडे स्क्रिनशॉट आणि व्हिडिओ रिकॉर्डिंग आहे. या माध्यमातून आम्ही कायदेशीर प्रक्रिया पार पाडू.

मोदीजी आणि योगीजी यांनी एकही मुल जन्माला न घालून बेरोजगारीचा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे, त्यांना काही काम नाही ते अनेक मुलांना जन्म देत आहेत. अशा लोकांमुळेच बेरोजगारी वाढत आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी बेरोजगारीचा प्रश्न मिटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असं निरहुआ व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत.

भोजपुरी स्टार आणि आता राजकीय नेते झालेले दिनेश लाल यादव म्हणालेत की, खोटे व्हिडिओ शेअर करण्याचा काँग्रेसमध्ये ट्रेंड आला आहे. कोणीही व्हिडिओ पाहिला तर कळेल की ओठ काही वेगळं बोलत आहेत. एआयच्या मदतीने आवाजाचे क्लोनिंग करण्यात आले आहे.

हेही वाचा :

तिहार तुरुंगातच राहणार केजरीवाल, न्यायालयाने वाढवली न्यायालयीन कोठडी

‘तो’ Six बघून वानखेडेच्या ड्रेसिंगरुममध्ये धोनीही Shock! कॅप्टन कूलची Reaction झाली Viral

हातकणंगलेमध्ये ट्विस्ट; आवाडेंची समजूत काढण्यास मुख्यमंत्र्यांना यश; आवाडे लोकसभेच्या रिंगणाबाहेर