राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना (farmer)मोठा दिलासा देत, सरकारने दुधाचा दर प्रतिलिटर ३५ रुपये जाहीर केला आहे. यामध्ये ३० रुपये प्रतिलिटर हा दूध संघांकडून मिळणारा दर असेल, तर उर्वरित ५ रुपये प्रतिलिटर शासनाकडून अनुदान म्हणून दिले जातील.
राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत ही घोषणा केली. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर आणि लोणी यांच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. तसेच, दुग्धव्यवसायाला चालना मिळून राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.
ही नवी दर योजना १ जुलै २०२४ पासून लागू होणार आहे
हेही वाचा :
सलमान खान हत्या कट: पाकिस्तानी कनेक्शन उघड, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळ्याचा पर्दाफाश
कोल्हापूर जिल्ह्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या घटली, तरी गुणवत्तेत चमक कायम
इचलकरंजी महापालिकेने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणयोजनेची अंमलबजावणी सुरू