भारत सरकारने हृदय आणि यकृत यांसारख्या अनेक आजारांवर उपचार(medicines) करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. साखर, वेदना, हृदय, यकृत, संसर्ग, ऍलर्जी, मल्टीविटामिन, अँटासिड, अँटीबायोटिक्ससह 41 औषधांचा समावेश असलेल्या 41 औषधांचे आणि 6 फॉर्म्युलेशनचे दर सरकारने निश्चित केले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (medicines) 143 व्या बैठकीत औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय याबाबत राजपत्रात अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.
याशिवाय कंपन्यांना ही माहिती डीलर्सला तातडीने देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. औषध कंपन्या ग्राहकांकडून औषधाच्या किंमतीव्यतिरिक्त फक्त जीएसटी आकारू शकतात, असेही सरकारी निर्देशांमध्ये म्हटले आहे.
देशातील अनेक लोक ॲलर्जी, इन्फेक्शन, शुगर, पेनकिलर, हृदय, यकृत, मल्टीविटामिन, अँटिबायोटिक्स इत्यादी समस्यांशी झुंजत आहेत. या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे खूप महाग आहेत. या औषधांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने एनपीपीएच्या बैठकीत 41औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला.
देशात 10 कोटींहून अधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत. अशा परिस्थितीत या आजाराशी संबंधित औषधांच्या किमती कमी करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
फेब्रुवारी 2024 मध्ये देखील NPPA ने मधुमेह आणि उच्च रक्तदाब या दोन्ही उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या 69 औषधांच्या किमती कमी केल्या होत्या. NPPA ने या आजारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 69 औषधांच्या फॉर्म्युलेशनची किरकोळ किंमत निश्चित केली होती आणि 31 फॉर्म्युलेशनच्या औषधांच्या किमती ठरवल्या होत्या.
हेही वाचा :
मोठी अपडेट; सर्व योजनांचे पैसे लाभार्थ्यांना लवकरच UPI मार्फत
लाचारीलाही मर्यादा असते,’ जिरेटोप वादावरुन शरद पवार संतापले
यंदा आयपीएलचं जेतेपद कोण पटकावणार?ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने जाहीर केलं संघाचं नाव!