पंतप्रधान मोदींचे पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना मोठं ‘गिफ्ट’

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये(farmers) काही तासांतच शेतकऱ्यांना पहिलं मोठं गिफ्ट दिलं आहे. पदाचा कार्यभार स्वीकारताच मोदींनी शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 20 हजार कोटी जमा केले.

पंतप्रधान मोदींनी(farmers) रविवारी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्या फाईलवर सही केली. ही फाईल पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 17 व्या हप्त्याची होती. मोदींनी शिक्कामोर्तब केल्यानंतर देशभरातील 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20 हजार कोटी जमा करण्यात आले.

फाईलवर सही केल्यानंतर मोदी म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी आमचे सरकार कटिबध्द आहे. त्यामुळे पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शेतकरी हिताच्या फाईलवर पहिली सही केली. पुढील काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रामध्ये आणखी काम करायचे आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींसह रविवारी 72 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये 30 कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सहा जणांना मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ हे मंत्रिमंडळात असतील.

हेही वाचा :

दिवस, राजकीय चिंतनाचे…!

केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच खुशबखर मिळणार? आठवा वेतन आयोग लागू होणार

ब्रेकिंग! ‘शिवसेना शिंदे गट, अजित पवार गटातील ४० आमदारांची घरवापसी होणार’