महायुतीच्या प्रचाराचा मास्टरप्लॅन! पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ दिवस असणार महाराष्ट्र दौऱ्यावर

मुंबई : विधानसभा (politics)निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. अवघ्या एका महिन्यावर निवडणूक आली असून येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्व नेत्यांची जोरदार तयारी सुरु आहे. महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

भाजपने(politics) पहिली यादी जाहीर करत बाजी मारली. त्याचबरोबर शिंदे गट व अजित पवार गटाने सुद्धा उमेदवार जाहीर केले आहेत. आता प्रचारासाठी महायुतीने मोठा प्लॅन तयार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः महायुतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये येणार आहेत. तब्बल आठ दिवस ते महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून बसणार आहेत.

महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी आज दिल्लीवारी केली आहे. काही जागांवर महायुतीमध्ये कलह निर्माण झाला होता. या संदर्भात चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दिल्लीमध्ये गेले होते.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी तिन्ही नेत्यांची ही बैठक झाली असून यामध्ये जागावाटपाची शेवटची चर्चा होऊन उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे बोलले जात आहे. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा महाराष्ट्र दौरा ठरला आहे. प्रचारासाठी पंतप्रधान मोदी हे आठ दिवस राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे 18 नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे महायुतीचा प्रचार कशा पद्धतीने करायचा आणि कोणकोणते राष्ट्रीय नेते राज्याच्या दौऱ्यावर येणार याची बांधणी सध्या सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. आठ दिवस नरेंद्र मोदी हे सभा घेणार आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये पंतप्रधानांच्या सभा होणार आहेत.

फक्त भाजपच्या उमेदवारांसाठी नाही तर महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधानांच्या सभा होणार आहेत. विभाग निहाय या सभा पार पडणार आहेत. येत्या 7 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महाराष्ट्र दौरा असणार आहे. 14 नोव्हेंबर नंतर पंतप्रधान परदेश दौऱ्यावर असल्यामुळे लवकरात लवकर जास्तीत जास्त सभा घेण्याचा महायुतीचा प्रयत्न असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या प्रचारामध्ये मोठा प्रभाव आणणार आहेत.

काही महिन्यांपूर्वी देशामध्ये लोकसभा निवडणूक पार पडली. यावेळी सुद्धा प्रचारामध्ये महायुतीने जोरदार प्रयत्न केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रावर लक्ष देत अनेक प्रचार सभा घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेवेळी महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून होते. त्याचबरोबर भाजपचे इतर केंद्रीय नेते देखील प्रचारासाठी येत होते. आता विधानसभा निवडणुकीवेळी देखील पंतप्रधान मोदी हे आठ दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. अमित शाह यांनी देखील महायुतीचे जागावाटप व फॉम्युला ठरवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

हेही वाचा :

ऐन सणासुदीत खाद्यतेलासह डाळींच्या किंमतीही वाढल्या

पत्नीसोबत चुकूनही शेअर करु नका ‘या’ 3 गोष्टी, पत्नी विश्वास ठेवणं बंद करेल

‘भाईजान’ला पुन्हा धमकी, “सलमान खानने माफी मागावी, नाहीतर…”; लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचा इशारा