रायपूरवरून ३८ प्रवासी घेऊन नागपूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स बसचा मोहघाटा जंगलात (the forest)महामार्गाचे काम सुरू असलेल्या भागात पलटून अपघात झाला. यात बसमधून प्रवास करत असलेले तीन प्रवासी जखमी झाले.
साकोली(जि. भंडारा) : रायपूरवरून ३८ प्रवासी घेऊन नागपूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स बसचा मोहघाटा जंगलात(the forest) महामार्गाचे काम सुरू असलेल्या भागात पलटून अपघात झाला. यात बसमधून प्रवास करत असलेले तीन प्रवासी जखमी झाले. ही घटना आज मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास वाजता घडली आहे.
छत्तीसगड राज्यातील रायपूरवरून नागपूरकडे जात असलेली खासगी ट्रॅव्हल्स बस मध्यरात्री साकोलीवरून लाखनीकडे रवाना झाली. तेली नाला जंगल परिसरात वन्यप्राण्यांसाठी अंडर पासचे बांधकाम सुरू आहे.
या ठिकाणी अन्य एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रॅव्हल्स (क्रमांक सीजी ०८/एयू ५४००) खोदलेल्या शोल्डर खड्ड्यात उलटली. या घटनेत बसमधून प्रवास करत असलेले धर्मेंद्र शिवकुमार कोसले (वय ३६,रा. खापरीकला), धर्मेंद्रची पत्नी गंगोत्री (वय ३४) यांच्यासह आणखी एक प्रवासी असे तिघे जण जखमी झाले आहेत.