बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचं खासगी (news)आयुष्य हे नेहमीच चर्चेत असतं. त्याची आणि गौरीची जोडी ही लोकप्रिय कप्लसपैकी एक आहे. त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे याविषयी आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण एक अशी वेळ आली जेव्हा शाहरुख खानचं नाव प्रियांका चोप्राशी जोडण्यात आलं होतं. खरंतर, 2010 मध्ये शाहरुख आणि प्रियांकाच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं आहे की प्रियांका चोप्रासोबत शाहरुखचं नाव जोडल्याचे कळल्यानंतर गौरीनं शाहरुखला प्रियांकापासून दूर राहण्यास सांगितलं.

इतकंच नाही तर पुन्हा एकत्र काम करायचं नाही याविषयी देखील सांगितलं. पण त्यांच्या अफेअरच्या बातम्यांमध्ये शाहरुखला याविषयी विचारण्यात आल्यावर त्यानं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांना आश्चर्य झालं होतं. शाहरुख खान आणि प्रियांदा चोप्रानं ‘डॉन’ फ्रेंन्चायझीमध्ये एकत्र काम केलं. त्यांनी अनेक अवॉर्ड फंक्शन्समध्ये एकत्र परफॉर्म केलं. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. हळू हळू त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री ही ऑफ-स्क्रीन देखील दिसू लागली. पण शाहरुख खाननं 2012 मध्ये प्रियांकासोबतच्या अफेअरच्या (news)चर्चांवर प्रश्न विचारण्यात आल्यावर शाहरुख खाननं दिलेल्या उत्तराची क्लिप व्हायरल झाली आहे.
शाहरुख खाननं सांगितलं की ‘माझ्यासाठी सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की माझ्यासोबत काम करणाऱ्या एका महिलेला प्रश्न विचारण्यात आला आणि कुठे ना कुठे तिला तो सन्मान मिळाला नाही, जो सन्मान मी इतर महिलांना देतो. मला वाटतं की हे थोडं अपमानास्पद आहे. मला त्यासाठी खूप वाईट वाटतं. तिच्यासाठी मी जे काही केलं यासाठी नाही तर यासाठी की ती माझी मैत्रिण आहे यासाठी.’
शाहरुखनं पुढे सांगितलं की ती ‘माझी सगळ्यात जवळच्या मित्र-मैत्रिणींपैकी एक होती आणि माझ्या हृदयाच्या जवळ होती. इतकंच नाही तर ती कायम माझ्या हृदयाच्या जवळ राहिल. मला कधी-कधी असं वाटतं की जेव्हा असं म्हटलं जातं की मी त्या व्यक्तीपासून लांब राहायला पाहिजे, तर (news)मला हे फारचं बालिश असल्यासारखं वाटतं आणि कारण काय तर ते चुकीचं दिसतंय. त्यामुळे हे त्या नात्यांना खराब करतं, जे एकत्र काम करतात आणि त्यांचे सहकर्मचारी हे तेच लोकं आहेत.’

शाहरुख आणि प्रियांकाच्या मॉडेलिंगच्या दिवसांपासून ओळखतो. त्याविषयी बोलताना म्हणाला, सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे की यामुळे मैत्री थोडी का होईना ही खराब होते. प्रियांकानं अफेयरच्या चर्चांना कशा प्रकारे हाताळलं? याविषयी विचारताच शाहरुख म्हणाला, ‘मला वाटतं की ती तिच्या वयापेक्षा खूप जास्त सुज्ञ आहे आणि या सगळ्यातून कसं सांभाळायचं हे तिला माहित आहे. पण मला वाटतं की आपण कोणत्याही नात्याला समजून न घेता त्याला नाव देण्याची घाई करतो. हे फक्त मीडिया नाही तर आपल्या सगळ्यांविषयी एक वेगळी गोष्ट आहे.’ दरम्यान, शाहरुख आणि प्रियांकानं ‘डॉन 2’ मध्ये
हेही वाचा :
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, अग्रीम पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
मुंबईत जगातील मोठी मनोरंजन इंडस्ट्री होणार; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
राज्यात उष्माघातामुळे 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?