इचलकरंजी: शहरातील सम-विषम पार्किंगच्या(parking) अंमलबजावणीबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, यासंदर्भात लवकरच अप्पर पोलीस अधिक्षकांसोबत बैठक घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन उपविभागीय पोलीस अधीक्षक समीरसिंह साळवे यांनी दिले.

शहर वाहतूक सल्लागार समितीची बैठक ३ जानेवारी २०२५ रोजी तब्बल १४ महिन्यांनंतर पार पडली. या बैठकीत सम-विषम पार्किंगसह(parking) अन्य वाहतूक समस्यांवर सखोल चर्चा झाली. नागरिकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर साळवे यांनी यावर फेरविचार केला जाईल, असे तोंडी आश्वासन दिले होते. तसेच, शहिद भगतसिंग बागेजवळील नो पार्किंग झोनबाबतही पुनर्विचार केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, बैठकीनंतरही वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी प्रशांत निशाणदार यांनी “सम-विषम पार्किंगच्या अंमलबजावणीचा निर्णय आमच्या अधिकार क्षेत्रात नाही, त्यामुळे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करावी,” असे स्पष्ट केले. त्यामुळे व्यापारी व वाहनधारकांमध्ये अधिक असंतोष निर्माण झाला आहे.
या निर्णयामुळे शहरातील व्यावसायिक अडचणीत आले असून, ग्राहकांना पार्किंग अभावी व्यवहार करणे कठीण झाले आहे. यावर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा ७ दिवसांत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा इचलकरंजी नागरिक मंचतर्फे देण्यात आला आहे.
यासंदर्भात लवकरच अप्पर पोलीस अधिक्षकांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे साळवे यांनी आश्वासन दिले आहे. निवेदन देताना संजय डाके, उदयसिंह निंबाळकर, उमेश पाटील, शितल मगदुम, महेंद्र जाधव, दीपक पंडित, राम आडकी, गोपाल पटेकरी, विद्यासागर चराटे आणि अभिजित पटवा आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा :
तुम्हालाही अन्न पचवण्यास त्रास होतो का करा ही योगासनं औषधांशिवाय मिळवा आराम
डोक्यावर कर्जाचा डोंगर, उसनवारीच्या पैशांचा तगादा, बायको अन् पोटच्या लेकानं केली बापाची हत्या; सांगली हादरलं
शारीरिक संबंध अन् व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; काँग्रेसच्या नेत्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा