गणेशोत्सवाच्या अगोदर एसटी (ST)महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनामुळे राज्यातील २५१ एसटी आगारांपैकी ५९ आगारांची सेवा ठप्प झाली आहे, ज्यामुळे गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या आणि ग्रामीण भागांतील प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही भागांमध्ये एसटीच्या सेवेमुळे ग्रामीण महाराष्ट्राचे जीवनमान ठप्प झाले असून, प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बुधवारी सायंकाळी कामगार संघटनांची बैठक होणार असून, या बैठकीत काही तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. परंतु आंदोलनकर्त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे कामगार संघटनांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा:
कागलमध्ये शरद पवारांचा हल्लाबोल: ‘संकटकाळी सोडून गेलेल्यांचा हिशोब करायचा आहे’
लाडकी बहीण योजनेवर गैरप्रकार करणार्यांना कडक कारवाईची चेतावणी; मुख्यमंत्र्यांचा इशारा
महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? पंकजा मुंडे यांचे सूचक विधान, म्हणाल्या…