हैद्राबादमधील संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमिअर शोवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अल्लू अर्जुनवर वेगवेगळे आरोप(allegations) केले जात आहेत. अल्लू अर्जुनमुळेच या महिलेचा मृत्यू झाला, असा दावा केला जातोय. तेलंगाणातील काँग्रेसचे नेते तथा मुख्यमंत्री रवेंथ रेड्डी यांनी अल्लू अर्जुनला नव्याने आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. त्यानंतर अल्लू अर्जुनने पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळले आहेत. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत अल्लू अर्जुन भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
अल्लु आर्जुनच्या चित्रपटाच्या प्रिमियर शोवेळी झालेली चेंगराचेंगरी आणि महिलेच्या मृत्यूचा मुद्दा तेलंगणाच्या विधानसभेत उपस्थित करण्यात आला. यावेळी एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी अल्लू अर्जुनवर त्याचे नाव न घेता गंभीर स्वरुपाचे आरोप(allegations) केले. चेंगराचेंगरीत 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे अल्लू अर्जुनला सांगण्यात आले होते. त्यानंतरही तो चित्रपट पाहात बसला. तसेच आता चित्रपट चांगलाच हिट होणार, असंही अल्लू अर्जुन म्हणाला असा दावा, अकबरुद्दीन ओवैसी यांनी विधानसभेत केला.
ओवैसी यांच्या या दाव्यानंतर अल्लू अर्जुनने त्याच्या हैदराबादमधील जुबली हिल्स येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याने रेवंथ रेड्डी तसेच अकबरुद्दीन ओवैसी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले. चित्रपटाच्या प्रिमियरवेळी झालेली घटना हा दुर्दैवी अपघात होता. यात माझा काहीही दोष नाही. चित्रपटगृहाला मी मंदीर समजतो. चित्रपटगृहाच्या परिसरात अशी घटना झाल्यामुळे मला दु:ख झालेले आहे, असे अल्लू अर्जुन म्हणाला.
VIDEO | Actor Allu Arjun (@alluarjun) got emotional as he addressed a press conference in Hyderabad over 'Pushpa-2' stampede incident, earlier today.
— Press Trust of India (@PTI_News) December 21, 2024
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/ipg1HGiVdd
तसेच, माझ्यावर अपमानजनक आरोप करण्यात आले आहेत. सोबतच असे आरोप करून माझे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. लोक मला गेल्या 20 वर्षांपासून ओळखतात. एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर चित्रपट हिट होईल, असे मी कसे म्हणू शकतो. मी सध्या कामालाही जाऊ शकत नाहीये, असं अल्लू अर्जुनने यावेळी सांगितलं. हे सर्वकाही कथन करत असताना अल्लू अर्जुनला भावना अनावर झाल्या. त्याचा कंठ दाटला होता.
दरम्यान, तेलंगाणाच्या विधानसभेत करण्यात आलेले सर्व आरोप अल्लू अर्जुनने फेटाळल्यानंतर आता पुढे काय होणार? तेलंगाणाचे सरकार नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
रवींद्र जडेजाच्या पत्रकार परिषदेत राडा…
सर्वसामान्यांना झटका! जीएसटी परिषदेने ‘तो’ निर्णय घेण्याचे टाळले; महागाईचा फटका बसणार
गुगलचा मोठा निर्णय, 10 टक्के कर्मचाऱ्यांना देणार नारळ