नेहमी नेहमी नाश्त्यात तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ (recipe)खाण्याची इच्छा निर्माण होते. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. सकाळी नाश्ता करणे ही आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगली सवय आहे. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. त्यामुळे सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे.
पोटभर नाश्ता केल्यामुळे दुपारपर्यंत पोट भरलेले राहते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. अशावेळी तुम्ही नाश्त्यात बेसन पराठा बनवू शकता. बेसन पराठा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. याआधी तुम्ही आलू पराठा, कोबी पराठा, पनीर पराठा इत्यादी सर्व पराठे खाल्ले असतील पण आज आम्ही तुम्हाला बेसन पराठा बनवण्याची सोपी(recipe) रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया बेसन पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
बेसन
गव्हाचं पीठ
मीठ
तेल
लाल तिखट
हिंग
गरम मसाला
पाणी
तूप
हळद
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
कृती:
बेसन पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताटात गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून घ्या. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार बेसन टाकून मिक्स करून घ्या.
मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाला, हिंग आणि थोडस तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
तयार केलेल्या पिठात गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या. पिठात जास्त पाणी घालू नये.
पीठ मळून झाल्यानंतर पिठाला तेल लावून 10 मिनिट ठेवून घ्या. नंतर तयार पिठाचे छोटे छोटे गोळे करून पराठे लाटा.
तव्यावर पराठे भाजण्यासाठी टाकल्यानंतर दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या आणि तूप लावून सर्व्ह करा.
तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले बेसन पराठे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींसाठी महत्वाची माहिती: आधार-बँक खाते लिंक करा, मिळवा ७५०० रुपये!
सोनं – चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा, दरात पुन्हा घसरण
पुष्पा-2 स्क्रिनिंगदरम्यान ड्रग्ज पेडलरला अटक