लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा हाणामाऱ्यांनी गाजला! महाराष्ट्रात ३ ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये राडा

राज्यातील ११ लोकसभा मतदार संघामध्ये लोकसभेचे तिसऱ्या टप्प्यतील मतदान(politics) पार पडत आहे. मतदानादरम्यान अनेक मतदान केंद्रांवर राडा, हाणमारी, आरोप-प्रत्यारोप अन् शाब्दिक बाचाबाची झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. धाराशिव, सांगली तसेच हातकणंगलेमध्ये अशाच मारहाणीच्या घटना घडल्या आहेत.

सांगोल्यात दोन गटात राडा…
मतदानादरम्यान दोन गटात मारहाण (politics)झाल्याचा प्रकार सांगोल्यातून समोर आला आहे. सांगोला तालुक्यातील महूद येथे शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरात हाणामारी झाली यामध्ये दोन्ही गटातील पाच ते सहा कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हातकणंगलेत शिंदे गट- ठाकरे गट आमने सामने…
त्याचबरोबर हातकणंगले मतदार संघातही शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशिल माने यांचे कार्यकर्ते अन् ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर यांचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वाळवा तालुक्यालील साखराळे गावातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांकडून एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली.

धाराशिवमध्ये राडा, एकाचा मृत्यू..
दरम्यान, धाराशिवमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर चाकू हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाठसांगवी गावाच्या मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

हेही वाचा :

कोणाच्या डोळ्यात आसू तर कोणाच्या हाती वस्तरा

हातकणंगलेमध्ये गोंधळ, धैर्यशील माने आणि सरुडकर गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

मोदींनीच पोस्ट केला स्वत:चा नाचतानाचा Video! पोलिसांचं टेन्शन का वाढलं?