कोल्हापुरातील गोकुळच्या सभेत राडा; सत्ताधारी विरोधक आमने- सामने

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) ६२ वी वार्षिक सर्वसाधारण(rada) सभा वादळी ठरली. मंजूर, नामंजूरच्या घाेषणा व विरोधकांचा गोंधळ यामुळे सभेत गदाराेळ झाला. सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आल्यामुळे वातावरण तापले. विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. सभेत दिवंगत नेते, जवान आणि दूध उत्पादक याना श्रद्धांजली वाहत असताना देखील विरोधकांची घोषणाबाजी सुरु होती. अध्यक्ष डोंगळे प्रास्तविक करत असताना महाडिक समर्थकांची हुल्लडबाजी सुरू होती.

शुक्रवारी दुपारी १ वाजता गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध संघाची ६२ वी सर्वसाधारण(rada) वार्षिक सभा सुरू झाली. सभा सुरु होण्यापूर्वीच महाडिक समर्थकांकडून गोंधळ घालण्यास सुरुवात झाली. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सभेमध्ये सभासदांच्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देण्यात येतील, असे सांगितले होते. त्यासाठी सभासदांकडून प्रश्नही मागविण्यात आले होते. मात्र, महाडिक गटाकडून सभा सुरु होण्यापूर्वीच गोंधळ घालण्यास सुरुवात झाली.

संचालिका शौमिका महाडिक सभास्थळी येताच त्यांच्या समर्थकांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांत धुमचक्री झाली. महाडिक यांच्या समर्थकांनी आमदार सतेज पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. तर आमदार सतेज पाटील यांच्या समर्थकांनी सतेज पाटलांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. त्यामुळे जोरदार सभेच्या ठिकाणी गोंधळ झाला.

शौमिका महाडिक यांना प्रवेश देण्यात आला. पण कार्यकर्त्यांना अडवल्यानंतर जोरदार वादावादी झाली. बॅरिगेट्स तोडून महाडिक समर्थकांनी सभास्थळी प्रवेश केला. पोलिसांनाही त्यांना आवरणे अवघड झाले होते. दुसरीकडे सभास्थळी गोकुळचे अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे स्वागतपर भाषण करीत होते. यावेळी काही कार्यकर्त्यांनी बोगस दूध संस्था नोंदणी केली आहे. दुधाचे संकलन कमी झाल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा:

कपिल शर्माने खरेदी केलं प्रायव्हेट जेट? पत्नी गिन्नीसोबत स्वॅगमध्ये एन्ट्री

“मोदींची माफी राजकीय, महाराष्ट्रानं माफ केलेलं नाही”; राऊतांचं मोदींना प्रत्युत्तर

माजी गृहराज्यमंत्र्याच्या मुलाच्या हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; राजकीय वर्तुळात खळबळ