प्रचार रॅलीत तुफान राडा! महायुती- ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने

छत्रपती संभाजीनगरमधून एक महत्वाची बातमी(sms campaign) समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकांच्या प्रचार रॅली दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह महायुती आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने- सामने आल्याने हायहोल्टेज ड्रामा झाला. यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकारानंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यांतील निवडणुकांच्या(sms campaign) प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार रॅलीदरम्यान हा राडा झाला.

चंद्रकांत खैरे यांच्या रॅलीवेळीच संदिपान भुमरे यांचीही रॅली निघाली आणि दोन्हीकडचे कार्यकर्ते जोरदार घमासान झाले. क्रांती चौकात झालेल्या या राड्या दरम्यान ‘मनसे दोनशे’च्या घोषणा देत नोटा दाखवून मनसे कार्यकर्त्यांना डिवचले. यावेळी अंबादास दानवे यांनीही मनसे कार्यकर्त्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

प्रचार रॅलीत तुफान राडा! महायुती- ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने

दरम्यान, यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाल्याचाही दावा केला जात आहे. मात्र असा प्रकार झाला नसल्याची प्रतिक्रिया संदिपान भुमरे यांनी दिली आहे. तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळेच असा राडा झाल्याचा आरोप करत ४ जूननंतर उत्तर देऊ, अशी टीका महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.

हेही वाचा :

संभ्रम निर्माण करणारे पंतप्रधानांचे वक्तव्य…!

इचलकरंजी येथील चेक बोंस प्रकरणी  एकास दंडासह शिक्षा

भारत-पाक सीमेवर थरार, सुमारे 25 राउंड फायरिंगनंतर पळाले पाकिस्तानी ड्रोन