“दीनानाथ” मधील राहू केतू?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : दिनानाथ मंगेशकर धर्मादाय रुग्णालयामधील(hospital) कर्मचाऱ्यांमध्ये संवेदनशीलता नाही आणि तनिषा उर्फ ईश्वरी भिसे या गर्भवती रुग्णावर उपचार करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये डिपॉझिट भरण्यास सांगितले. याची स्पष्ट शब्दात कबुली या रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पण एका तरुण गर्भवतीचा जीव गेला, त्याची सामूहिक जबाबदारी घेण्याऐवजी घडलेल्या प्रकाराला डॉक्टर केळकर यांनी ग्रह म्हणून मान्यता नसलेल्या राहू केतूला जबाबदार धरले आहे.

तनिषा उर्फ ईश्वरी भिसे ह्या गर्भवती महिलेचे मृत्यू प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राने उचलून धरल्यानंतर शासनाने कारवाईचे पाऊल उचलले आहे. एका समितीने केलेल्या चौकशीत रुग्णालय प्रशासनाला जबाबदार धरले आहे. आणखी दोन चौकशी अहवाल राज्य शासनाला सादर केले जाणार आहेत. या तीन अहवालातून रुग्णालय प्रशासन अडचणीत येणार आहे हे लक्षात आल्यानंतर या रुग्णालयाचे(hospital) कार्यकारी संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली.

तनिषा उर्फ ईश्वरी भिसे यांच्या उपचाराशी निगडित असलेले डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिला असल्याचे माहिती त्यांनी यावेळी दिली. मात्र डॉक्टर घैसास यांनी त्यांच्याकडून झालेल्या अक्षम्य चुकीची कबुली दिलेली नाही. रुग्णालयाची होत असलेली बदनामी, रुग्णालया विरुद्ध रोज होत असलेली निदर्शने, मला जिवे मारण्याच्या येत असलेल्या धमक्या यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी संचालक मंडळाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

रुग्णाला दाखल करून घेताना जो फॉर्म भरून घेतला जातो, त्यामध्ये डिपॉझिट भरा असा कॉलम नसतो आणि नाही. पण डॉक्टर घैसास यांच्या डोक्यात काय राहू केतू घुसले होते माहिती नाही पण त्यांनी फॉर्ममध्ये स्वतः एक चौकट तयार करून त्यामध्ये दहा लाख रुपये भरा अशा सूचना भिसे कुटुंबीयांना दिल्या होत्या. गुंतागुंतीचा आजार असलेल्या आणि क्लिष्ट उपचार पद्धती असलेल्या, महागडे उपचार असलेल्या प्रकरणात रुग्णालयाकडून डिपॉझिट घेतले जाते. सरसकट रुग्णांकडून डिपॉझिट भरून घेतले जात नाही. आता मात्र इमर्जन्सी केस मध्ये डिपॉझिट भरण्याची सूचना येथून पुढे दिल्या जाणार नाहीत.

रुग्णालयातील(hospital) प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा कामाचा ताण वाढला असल्यामुळे त्यांच्याकडून रुग्णाला किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना असंवेदनशील वागणूक दिली जात असेल तर येथून पुढे खबरदारी घेतली जाईल. असेही डॉक्टर धनंजय केळकर यांनी सांगितले आहे.

तनिषा उर्फ ईश्वरी भिसे यांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये भरण्यास डॉक्टर घैसास यांनी सांगितले होते. ही चूक त्यांनी मान्य केली. पण या चुकीचं सामूहिक जबाबदारी म्हणून डॉक्टर केळकर यांनी व त्यांच्या संचालक मंडळाने प्रायश्चित्त घेतले पाहिजे. पण ते साधी माफी मागताना दिसत नाहीत. घडलेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना दिसत नाहीत. घडलेल्या प्रकाराचे खापर ते चक्क राहू केतूवर फोडतात.

21व्या शतकात असे एकही क्षेत्र नाही, अशी एकही आस्थापना नाही की तिथे कामाचा ताण नाही. ताण तणाव खूप आहे याची माहिती असूनही तिथे काम करणारे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत,तज्ञ आहेत. वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा ताण तणाव आहेत. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये(hospital) रुग्णांची संख्या जास्त असते त्याचप्रमाणे तेथे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची ही संख्या जास्त असते. या क्षेत्रातही ताण तणाव आहेत.

हे वास्तव स्वीकारून तेथील कामकाज चालते. त्यामुळे ताणतणाव आणि संवेदनशीलता यांची परस्परांशी सांगड घालता येत नाही. उलट अशा रुग्णालयामध्ये तेथील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांवर संवेदनशीलतेचे संस्कार केले गेले पाहिजेत. त्यासाठी वर्ग घेतले पाहिजेत. कारण ना रुग्णालयामध्ये रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक खऱ्या अर्थाने ताण-तणावाखाली असतात. त्यासाठीच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्याकडे संवेदनशीलता असलीच पाहिजे. ती नसल्याबद्दलची कारणे मुळातच सांगता येणार नाहीत.

चित्रसेन खिलारे यांच्या मूळ मालकीच्या सहा एकर परिसरात दीनानाथ मंगेशकर धर्मादाय रुग्णालयाची भव्य इमारत उभा आहे. राज्य शासनाने खिलारे यांची करोडो रुपये किमतीची ही शेतजमीन आरक्षित केली आणि नंतर ती नाममात्र एक रुपया भाडेतत्त्वावर रुग्णालय व्यवस्थापनाला दिली. विशेष म्हणजे चित्रसेन खिलारे यांच्या पिताश्रींचे निधन याच रुग्णालयात झाले, मात्र काही तासांसाठी त्यांचा मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात त्यांच्या नातेवाईकांनी केलेली विनंती रुग्णालय व्यवस्थापनाने”जागा उपलब्ध नाही”असे कारण सांगून नाकारली.

मात्र खिलारे कुटुंबीयांनी काही चक्रे फिरवल्यानंतर, मृतदेह ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. ज्या खिलारे कुटुंबीयांच्या त्यागावर या रुग्णालयाचा परिसर आहे त्याचं खिलारे कुटुंबातील एका व्यक्तीचा मृतदेह ठेवण्यासाठी आमच्याकडे जागा उपलब्ध नाही असे उत्तर दिले जात असेल तर या रुग्णालयातील संवेदनशीलता केव्हाच मृत झाली आहे असे म्हणावे लागेल.

धर्मादाय कायद्यातील तरतुदीनुसार या रुग्णालयातगरीब रुग्णांसाठी काही बेड शिल्लक ठेवले जातात काय? आणि ठेवले जात असतील तर गेल्या दहा वर्षात किती गरीब रुग्णांवर मोफत उपचार केले किंवा त्यांच्याकडून नाममात्र शुल्क घेतले याची यादी डॉक्टर धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषद घेताना सादर करणे आवश्यक होते. तनिषा उर्फ ईश्वरी भिसे यांचे पती भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचे स्वीय सहाय्यक आहेत. त्यांच्या संदर्भात हे प्रकरण घडले म्हणून, या रुग्णालयातील(hospital) व्हेंटिलेटर वर असलेली रुग्णसेवा समाजासमोर आली. अन्यथा हे असेच चालू राहिले असते.

हेही वाचा :

Vodafone-Idea युजर्ससाठी मोठी गुड न्यूज या 4 शहरांत सुरू होणार 5G सेवा

किवी खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का?

राजकारणात खळबळ! महाराष्ट्रातील बड्या पक्षाची मान्यता रद्द करण्याची न्यायालयात मागणी