नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत(Modi). त्यामुळे शेअर बाजारात मोठी वाढ होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही पीएम मोदींच्या विजयाचा मोठा फायदा झाला आहे. शेअर बाजारातील तेजीमुळे त्यांचा पोर्टफोलिओमध्येही वाढ झाली आहे. राहुल गांधींच्या स्टॉक पोर्टफोलिओमध्ये सुमारे 3.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
राहुल गांधी यांच्याकडे अनेक कंपन्यांचे शेअर्स (Modi)आहेत. यामध्ये इन्फोसिस, एलटीआय माइंड ट्री, टीसीएस, आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स आणि पिडीलाइट इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे. निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावरून ही माहिती मिळाली आहे.
निवडणुकीच्या निकालापूर्वी सोमवारी बाजारातील वाढीमुळे राहुल गांधींच्या खात्यात सुमारे 3.45 लाख रुपयांची वाढ झाली. मंगळवारी निवडणूक निकालाच्या दिवशीही त्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अंदाजे 4.08 लाख रुपयांची घट झाली होती.
यानंतर बुधवारपासून शेअर बाजारात तेजी सुरू झाली. बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, 5 जून रोजी राहुल गांधींच्या पोर्टफोलिओमध्ये सुमारे 13.9 लाख रुपयांची वाढ झाली आहे. 6 जून रोजी त्यात सुमारे 1.78 लाख रुपयांची वाढ झाली आहे. 31 मे पासून राहुल गांधींच्या पोर्टफोलिओमध्ये 3.46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यांना सुमारे 15 लाख रुपयांचा नफा झाला आहे.

4 जून 2024 रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी सत्ताधारी पक्ष भाजपला बहुमत न मिळाल्याने गुंतवणूकदारांचे 31 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. पण, पुढच्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये बाजारात मोठी रिकव्हरी झाली आणि गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 28.66 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
नोंद – म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
हेही वाचा :
समृध्दी महामार्गावर वैजापूरजवळ कार ट्रकला धडकली तिघांचा जागीच मृत्यू
एका वर्षात मध्यावधी लागू शकते, काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याच्या दावा
यूएसएच्या विजया सुपर ओव्हरमुळे टीम इंडियाला मोठा फटका