लोकसभा निवडणुकीत (election) भाजपला मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा जागांच्या संख्येत चांगलाच फटका बसला आहे. शिवाय, यंदा भाजप 400 पार असा असा दावाही करत होती. मात्र भाजपला केवळ 240 जागांपर्यंतच मजल मारता आली.
एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदींनी मागील दहा वर्षांत एका समुदायास दुसऱ्या समुदयाशी लढवण्याचे काम केले. निवडणूक काळात मोदी संविधान संपुष्टात आणण्याच्या गोष्टी करत होते. मात्र देशातील जनतेने त्यांना धडा शिकवला. मोदी केवळ अदाणी आणि अंबानीसाठी काम करतात, ते देशातील गरिबांसाठी काम करत नाहीत.
भाजपच्या पराभवाचं कारणही सांगितलं –
राहुल गांधी यांनी म्हटले की, भाजप अयोध्येत पराभूत झाली, ते उत्तर प्रदेशातही हरले. ते यामुळे हरले कारण ते भारताच्या विचारधारेवर हल्ला करत होते. आपल्या संविधानात भारताला राज्यांचा संघ म्हटले गेले आहे. भारत राज्ये, भाषा, इतिहास, संस्कृती, धर्म आणि परंपरांचा एक संघ आहे. तुम्ही सर्वांनी फोटो पाहिला असेल की, नरेंद्र मोदींनी संविधान आपल्या मस्तकी लावून धरले होते. हे देशातील जनतेने करण्यास भाग पाडलं आहे. पंतप्रधान मोदींना जनतेने संदेश दिला की, तुम्ही संविधानशी छेडछाड करू शकत नाहीत.
I.N.D.I.A आघाडीच्या विरोधात पूर्ण मीडिया होता. CBI, ED आणि संपूर्ण प्रशासन आमच्याविरोधात होते. निवडणूक आयोगाने पंतप्रधानांना अनुकूल अशी निवडणुकीची रुपरेषा तयार केली होती. अनेक प्रयत्नानंतर मोदी वाराणसीत पराभूत होता होता थोडक्यात वाचले. भाजप अयोध्येतही हारली, ते उत्तर प्रदेशातही हरले.
हेही वाचा :
गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानच्या घरी पोहचले पोलिस
परभणीचे खासदार संजय जाधव यांचा मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा
शेतकऱ्यांना ‘या’ तारखेला मिळणार PM किसानचा 17वा हप्ता, वाचा सविस्तर माहिती