राज्यात पावसाने (rain)मोठा कहर घडवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून 8424 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा उघडला असून भोगावती नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुकसबा बावडा परिसरात वडणगे कसबा बावडा मार्ग बंद झाला आहे.
गोदावरीला यंदाच्या पावसाळ्यातील दुसरा पूर आल्याने रामकुंड, गोदा घाटावरील मंदिरे आणि बुधा घाटावरील छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाने रामकुंड परिसरातील दुकाने सुरक्षित स्थळी हलवली आहेत. पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असून गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यातही पावसाने जोर पकडला आहे. भिडे पूल पाण्याखाली गेला आहे आणि खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 35 हजार 310 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा इशारा देण्यात आला आहे. डेक्कन भागात झेड ब्रिज पाणी भरल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील अंजनासागर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. अंजना नदीला पूर आल्यामुळे पळशी व देवपुळ गावांशी संपर्क तुटला आहे. धाराशिव जिल्ह्यात वाशी, कळंब, तुळजापूरसह विविध भागात पावसामुळे संपर्क तुटले आहेत.
राज्यात पावसाच्या जोरदार प्रभावामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हेही वाचा:
कल्याणमध्ये भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सामील
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त ‘करा उपवास’ संदेश; भक्तांची खास तयारी
रोहित शर्मा च्या घरी दुसऱ्यांदा गुड न्यूज; रितिकाच्या व्हायरल व्हिडिओने उचलली चर्चा