बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे आक्रमक: “४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्र कोरा करणार”

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेत(school) दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज ठाकरे यांनी या दुर्दैवी घटनेबाबत बोलताना म्हटले, “आज छत्रपती शिवाजी महाराज असते, तर त्यांनी या नराधमांचा चौरंग केला असता.” त्यांनी मनसेच्या महिला कार्यकर्त्यांचे कौतुक करताना हे प्रकरण उघडकीस आणल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली.

राज ठाकरे यांनी पोलिसांना ४८ तासांची मोकळीक देण्याची मागणी करताना स्पष्ट केले की, “जर मला संपूर्ण महाराष्ट्राची सत्ता दिली, तर मी ४८ तासांत हा प्रदेश कोरा करकरीत करून टाकेन. पोलिसांना फ्री हँड मिळाल्यास, कोणालाही आपल्या आया-बहिणींकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही.”

या प्रकरणाने समाजात खळबळ माजवली असून, राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे.

हेही वाचा:

राज ठाकरेंनी उमेदवार जाहीर करताच मनसैनिकांमध्ये तणाव; दोन गटांमध्ये हाणामारी

कायदा क्षेत्रातील ‘या’ पर्याय – विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली

शिक्षकाने नववीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ दाखवून धमकावल्याचा आरोप