राजस्थानचा पराभवाचाही चौकार

दोनदा विजयाचा चौकार ठोकून आयपीएलमध्ये अव्वल स्थान पटकावणाऱया राजस्थानला आता पराभवाचा चौकारही सहन करावा लागला. हैदराबाद(hyderabad), दिल्ली, चेन्नईपाठोपाठ स्पर्धेतून बाद झालेल्या पंजाबकडूनही त्यांना हार सहन करावी लागली. राजस्थानने प्ले ऑफ गाठले असले तरी आजच्या पराभवांमुळे त्यांची पहिले स्थान पटकावण्याची संधी हुकली. राजस्थानला 9 बाद 144 वर रोखल्यानंतर पंजाबने कर्णधार सॅम करणच्या तडाखेबंद 63 धावांच्या खेळीमुळे 7 चेंडू आणि 5 विकेट्सनी विजय मिळवला.

राजस्थानच्या 145 धावांचा पाठलाग करताना पंजाबची दमछाक उडाली. पन्नाशीत आघाडीचे स्टार फलंदाज आटोपल्यामुळे पंजाब अडखळला, पण कर्णधार सॅम करणने अष्टपैलू चमक दाखवताना जितेश शर्माबरोबर (22) पाचव्या विकेटसाठी 63 धावांची भागी रचत पंजाबचा विजय सोप्पा केला. त्यानंतर आशुतोष शर्माबरोबर चांगली भागी रचत पंजाबला 19 व्या षटकांतच विजय मिळवून दिला. 41 चेंडूंत 3 षटकार आणि 4 चौकार ठोकणारा सॅमच ‘सामनावीर’ ठरला.(hyderabad)

त्याआधी जोस बटलरच्या अनुपस्थितीत खेळणाऱया राजस्थानला यशस्वी जैसवाल आणि टॉम कोहलर चांगली सलामी देऊ शकले नाही. दोघेही लवकर बाद झाले. पुढे संजू सॅमसनने आपल्या अपयशी खेळींची मालिका कायम ठेवली. मात्र रियान परागने आणखी एक फटकेबाज खेळी केली.

त्याने 48 धावा चोपून काढताना रविचंद्रन अश्विनबरोबर 50 धावांची भागी रचली. पण ही जोडी फुटल्यानंतर रियानला कुणाचीही साथ लाभली नाही. नेहमीच षटकारांची आतषबाजी करणाऱया रियानला आज एकही षटकार खेचता आला नाही. त्याने शेवटपर्यंत किल्ला लढवल्यामुळे राजस्थानने 144 धावांपर्यंत मजल मारली.

हेही वाचा :

CAA कायद्या मुळे पहिल्यांदाच 14 जणांना मिळालं भारतीय नागरिकत्व

मुंबईत महायुतीचं ‘शक्ती’ प्रदर्शन, मोदींचा ‘रोड शो’

शांतोकडेच बांगलादेशचे नेतृत्व, टी-20 वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर