रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कॅप्टन रजत (hitting)पाटीदार सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2025 च्या सीजनमध्ये तो दमदार प्रदर्शन करतोय. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात वानखेडेवर सोमवारी रजत पाटीदारने जबरदस्त बॅटिंग केली. पाटीदारने या सामन्यात 32 चेंडूत 200 च्या स्ट्राइक रेटने 64 धावा फटकावल्या. या इनिंगमध्ये त्याने 4 सिक्स आणि 5 चौकार मारले. RCB च्या कॅप्टनने स्लो स्टार्ट केली होती. हार्दिक पंड्याने सुरुवातीला पाटीदारच्या हेल्मेटवर चेंडू मारला होता. पंड्या आणि मुंबईचे सुरुवातीचे हल्ले पचवल्यानंतर त्याने काऊंटर हल्ला सुरु केला. पाटीदारने पंड्याला चांगलाच धडा शिकवला.

देवदत्त पडिक्कल बाद झाल्यानंतर रजत पाटीदार 10 व्या ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. सुरुवातीला त्याने सावध फलंदाजी केली. पीच समजून घेतला. म्हणून पहिल्या 10 चेंडूत त्याने फक्त 8 धावा केल्या. 13 व्या ओव्हरमध्ये मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या स्वत: गोलंदाजीसाठी आला. पाटीदारने चौकाराने त्याचं स्वागत केलं. पुढच्याच चेंडूवर 2 धावा काढल्या.
पण तो थोडक्यात बचावला
त्यानंतर हार्दिक पंड्याने ऑफ साइडला एक फुलर (hitting)लेंथ चेंडू टाकला. पाटीदारने ऑफ स्टम्पवर शफल होत स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू जोरात त्याच्या जबड्याखाली हेल्मेटच्या ग्रीलवर धडकला. त्याला गंभीर दुखापत होऊ शकली असती. पण तो थोडक्यात बचावला. पाटीदार याने घाबरला नाही. पुढच्याच चेंडूवर त्याने अपर कटच्या माध्यमातून चौकार मारला.

पंड्याच्या 14 चेंडूत 33 धावा फटकावल्या
रजत पाटीदार आणि हार्दिक पंड्याचा पुन्हा 15 व्या व 17 व्या ओव्हरमध्ये पुन्हा आमना-सामना झाला. 15 व्या ओव्हरमध्ये पाटीदारने 2 चेंडू खेळून 1 चौकार मारुन 5 रन्स केल्या. तेच 17 व्या ओव्हरमध्ये त्याने पंड्याची गोलंदाजी फोडून काढली. त्याने या ओव्हरमध्ये 4 चेंडू खेळून 17 धावा काढल्या.(hitting) या दरम्यान पाटीदारने 2 सिक्स आणि 1 चौकार मारला. अशा प्रकारने पाटीदारने पंड्याच्या 14 चेंडूत 33 धावा फटकावल्या. म्हणजे रजत पाटीदारने 32 चेंडूतील 64 धावांच्या खेळीत निम्म्या धावा पंड्या विरुद्ध बनवल्या. त्याच्या या इनिंगमुळे बंगळुरुची टीम 20 ओव्हर्समध्ये 221 धावा करण्यात यशस्वी ठरली. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 9 गडी गमवून 209 धावा केल्या. त्यांना विजयासाठी 12 धावा कमी पडल्या.
हेही वाचा :
मजा बन गई सजा! घिबली ट्रेंडमुळे गोपनीतेला धोका, सायबर हल्ला होणार…
सूनबाई माझं म्हणणं नीट ऐकं लग्नाच्या दिवशी सासऱ्याने होणाऱ्या सूनेकडे अशी मागणी केली
महाराष्ट्र हादरला! बायको माहेरी गेल्याने सटकली; नवऱ्याने पत्नी आणि सासूला जिवंत पेट
मजा बन गई सजा! घिबली ट्रेंडमुळे गोपनीतेला धोका, सायबर हल्ला होणार…
अंबाबाईच्या दर्शनाआधी पंचगंगेत उतरले; पाण्यात उतरताच धाप लागली आणि… तरुणासोबत भयंकर घडलं