राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव याला सरकारची(suffer) धोरणं जबाबदार आहेत. आयात, निर्यात धोरणाच्या लहरीपणामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. त्याचा उत्पादन खर्चच निघत नाही. त्यामुळे काढलेले पीक कर्ज त्याला फेडता येत नाहीये. या कर्जाच्या जोखडातून शेतकऱ्याला काढा नाहीतर परिणाम भोगायला तयार राहा, असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
सरकारच्या(suffer) जाचक धोरणांमुळे ही स्थिती ओढवली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे केली. सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना ठेच लागली. हे दुर्लक्ष कायम राहिले तर आगामी निवडणुकांत पाय रक्तबंबाळ होतील, असेही ते म्हणाले.
येथे रविवारी (ता. ३०) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात उद्यापासून (ता. १) ‘वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन’ करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. वसंतराव नाईक यांनी हरित क्रांती यशस्वी करून राज्याला कृषिप्रधान बनवले.
त्यांच्या जयंतीदिनी महुली (ता. पुसद) या त्यांच्या जन्मगावातून कर्जमुक्ती आंदोलनाला सुरवात करीत आहोत. शेतकरी कर्जाच्या जोखडातून मुक्त व्हावेत, शेतमालाला योग्य भाव मिळावा याकडे सरकारचे लक्ष वेधून घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मराज शिंदे पाटील, विजयकुमार जाधव, माणिक गायकवाड उपस्थित होते.
राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. त्यावर शेट्टी म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून शेतमालाला योग्य भाव द्यावा. असे केले तर आमच्या बहिणींचा सांभाळ आम्हीच करू.
सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी सरकारला अशा योजना आणण्याची गरज भासणार नाही. सरकारचा सन्मान निधीसुद्धा आम्हाला नको. आंदोलन केल्याशिवाय पीकविमासुद्धा मिळत नाही, अशी स्थिती असल्याचे शेट्टी म्हणाले.
मी स्वत: शेतकरी आहे. खडकावर शेती करण्याचा अनुभव आहे. आता सरकाररूपी खडकावर शेती करून शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळवून द्यायची आहे, असे सांगून शेट्टी म्हणाले, शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्याला कर्जमाफी देऊन दिलासा देणे गरजेचे आहे. असे असताना इतर अनावश्यक घोषणा सरकार करीत आहे.
शक्तिपीठ मार्ग हे त्यापैकीच एक उदाहरण आहे. राज्यातील एकाही भक्ताने शक्तिपीठ मार्गाची मागणी केलेली नाही. सध्याचा मार्ग सुस्थितीत आहे. असे असताना केवळ कंत्राटदारांना पोसण्यासाठी ‘शक्तिपीठ’ महामार्ग लादला जात आहे. त्याला आमचा विरोध राहील. विकासाला आमचा विरोध नाही. पण, विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडणार असाल तर त्याला विरोधच असेल, असे शेट्टी म्हणाले.
समृद्धी महामार्गातून अमाप पैसा कमवला गेला. त्या पैशांतूनच आमदार, खासदारांची खरेदी-विक्री झाली. आता सरकारला शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून कोणाला ‘शक्ती’ द्यायची आहे?
हेही वाचा :
महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी सरकारच्या योजनेमुळे लाखों शेतकरींना मिळणार लाभ
पलक तिवारीच्या फोटोंवर इब्राहिम अली खानची ‘फायर’ कमेंट, नेटकरी म्हणाले “रिलेशनशिप कन्फर्म?”
जुलै महिन्यातील आर्थिक बदल: आयटीआर, पेटीएम वॉलेट, एसबीआय आणि आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड नियम