मुंबईः काँग्रेसचे प्रवक्ते आणि पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडणारे राजू वाघमारे यांनी शिवसेनेमध्ये(ircc express entry) प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी बोलताना राजू वाघमारे म्हणाले की, काँँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाची एका प्रादेशिक पक्षाने केलेली ससेहोलपट बघता कार्यकर्ते व्यथित आहेत. पक्षातल्या काही स्वार्थी आणि गलिच्छ राजकारणाने मी त्रस्त होतो त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
वाघमारे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील(ircc express entry) काही ठाराविक नेत्यांच्या हाताखाली काँग्रेस दबलेली आहे.. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस काम करतेय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबई उत्तर पश्चिमची जागा संजय निरुपम यांनी मागितली होती. परंतु त्यांना डावललं त्यामुळे त्यांना पक्षातून बाहेर पडावं लागलं.
”सांगलीची जागा काँग्रेसची आहे. परंतु उद्धव ठाकरेंनी ती जागा जाहीर केली. आता काँग्रेस नेत्यांना दिल्लीवाऱ्या कराव्या लागत आहेत. भिवंडीची जागा पारंपारिक काँग्रेसची होती तरीही शरद पवार गटाने त्यांच्या उमेदवाराची घोषणा केली.”
”त्यामुळे काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट झाली आहे. कुणाचा कुणाचा पत्ता नाही. म्हणूनच आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मी शिवसेनेत प्रवेश केला आहे.” असं राजू वाघमारे म्हणाले.
सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री कोण असेल, तर ते एकनाथ शिंदे आहेत. दोन वर्षांत त्यांनी केलेलं काम भारताच्या इतिहासात कुणीही केलेलं नाही, विरोधकांनाही हे मान्य करावं लागेल, एक कार्यकर्त्याची भावना जपणारा आणि त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारा नेता, अशी त्यांची इमेज आहे. अशा शब्दांमध्ये राजू वाघमारे यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं.
हेही वाचा :
शेअर बाजाराला मतदानानिमित्त सुट्टी
गळ्यात 7 चप्पलांचा हार अन् दारोदारी प्रचार, जाणून घ्या संपूर्ण प्रकार
हार्दिकला हेच हवं होतं की…; पहिल्या विजयानंतर पंड्याविषयी काय म्हणाला रोहित शर्मा?