मोदींचं मंदिर बांधणाऱ्या नेत्याचा भाजपला रामराम

2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Political) दुसऱ्यांदा विजय मिळवला आणि देशाची सत्ता हाती घेतली, तेव्हा मोदी भक्ती शिगेला पोहोचली होती. भक्तांनी मोदींना देवाचा दर्जा दिला. मोदींचं मंदिर बांधून प्रतिष्ठापनाही झाली. देशातील मोदींचं पहिलं मंदिर पुण्यात बांधल गेलं. 2021 मध्ये पुण्यातील औंध येथे मोदींचं मंदिर बांधण्यात आलं. हे मंदिर बांधणारे मयूर मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण मोदींनी देव मानत त्यांचं मंदिर उभारलेले मयूर मुंडेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिलीये.

भारतीय जनता पक्षाच्या(Political) शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी मयुर मुंढेंवर होती. मयूर मुंडेंच्या या निर्णयाने भाजपला धक्का बसलाय. एवढंच नाहीतर मयूर मुंडेंनी काही नेत्यांची नावं घेत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. यामुळे भाजपांतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. पुणे भाजपमध्ये नेमकं काय सुरूये?, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

पुणे भाजपमध्ये हुकूमशाही सुरू असल्याचं वारंवार समोर येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच कोथरुड विधानसभा मतदारसंघातील वाद समोर आलेला. भाजप नेते अमोल बालवडकर यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. मला पक्षाच्या मतदान प्रक्रियेत बहिष्कृत केले गेले, असा आरोप त्यांनी केला होता. यानंतर पुण्यात एकच खळबळ उडालेली. आता पुन्हा एकदा असात काहीसा प्रकार समोर आला आहे.

अमोल बालवडकर यांच्याप्रमाने मयूर मुंडे यांनी देखील भाजपमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. मयुर मुंडे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहित त्यांनी राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. तसेच या पत्रात त्यांनी राजीनामा देण्यामागची कारणं देखील नमूद केली आहेत.

इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेल्या लोकांच्या मतदारसंघात आमदार विकास निधी खर्च करतात, पण निष्ठावंत कार्यकर्त्यांना निधी दिला जात नाही, गेल्या पाच वर्षात शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात एकही दोन मोठे प्रकल्प राबवण्यासाठी आमदारांनी, ना निधी आणला ना कोणते प्रयत्न केले. त्यामुळे परिसराचा विकास ठप्प झाला आहे. तसंच भाजपमध्ये स्थानिक आमदाराच्या मर्जीने संघटनेतील पद वाटप होत आहेत.

निष्ठावंत वगळून मर्जीतील बाहेरून भरती केलेल्या ठेकेदारांना ही पदं दिली जात आहेत, असा आरोपही मयुर मुंडे यांनी केलाय. हे सगळं सांगत असताना मयूर मुंडेंचा रोष हा त्यांच्या मतदारसंघातील आमदार सिद्धार्थ शिरोळो यांच्यावर होता.

कोथरूडप्रमाणे सिद्धार्थ शिरोळे त्यांच्या मतदारसंघात मनमानी करत असल्याचं दिसतंय. मुंडेंच्या म्हणण्यानुसार शिरोळे मर्जीतील लोकांना प्राधान्य देत आहेत. यामुळे पक्षात निष्ठेने आणि प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचं मुंडेंनी म्हटलंय. पक्षाचं काम करून आपल्याला बळ मिळत नसेल तर उपयोग नाही. आपल्याच कार्यकर्त्यांच्या विरोधात दुसरे लोक तयार केले जातात असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा:

हत्तीला काठी मारणं पडलं भारी, १० सेकंदात तोडून टाकली हाडं Video Viral

प्रतीक्षा संपली, उरले अवघे काही तास, ‘सिंघम अगेन’चा ट्रेलर, रोहित शेट्टीने दाखवली झलक

युवकाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जबाबदार, त्यांना मी सोडणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा