रणबीर कपूर सध्या चर्चेत आहे. निखिल कामथच्या यूट्यूब चॅनेलला(cameras) नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, त्याने त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल भरभरुन सांगितले आहे. याच मुलाखतीमध्ये तो आलिया आणि राहाविषयीसुद्धा बोलला आहे. राहाला आलिया आणि रणबीरने पॅपराझींसमोर आणल्यापासून नेटकऱ्यांमध्ये तिच्याविषयी नेहमीच चर्चा असते. नुकताच रणबीर कपूरचा राहासोबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.

राहा फक्त दिड वर्षांची आहे. पण, तिचे हावभाव, क्युट अंदाज, कपडे, कधीतरीच देणारं(cameras) स्मितहास्य यामुळे तिच्याविषयी अनेकांना तिची भुरळ पडली आहे. अनेकदा रणबीर किंवा आलिया तिला विविध ठिकाणी घेऊन जाताना स्पॉट होतात. आताही एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये रणबीरसोबत राहा दिसली. विशेष म्हणजे पहिल्यांदाच पॅपराझींना पोझ देताना दिसली. तिने कॅमेरांकडे पाहून स्मितहास्य केले आहे. हे पाहून चाहते तिला छोटी आलिया भट्ट म्हणत आहेत. वांद्रे इथल्या घराच्या आवारातील हा व्हिडीओ आहे.
पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राहा पांढरा टी-शर्ट आणि ब्राऊन शॉर्ट्समध्ये कॅमेरामनकडे हसताना दिसत आहे. ती तिथे फिरतानाही दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते तिला आलिया भट्टची कॉपी म्हणताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिले, आता ती पूर्णपणे आलिया भट्टसारखी दिसते. गेल्या वर्षी ख्रिसमसला रणबीर आणि आलिया या जोडप्याने राहाचा चेहरा रिविल करत तिला पॅपराझींसमोर आणले होते. त्याआधी रणबीर आणि आलियाने सोशल मीडियापासून आणि पॅपराझींपासून तिला अलिप्त ठेवले होते.

तिची पहिली झलक समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ आणि फोटो नेटकऱ्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. खरेतर स्टार किड्सविषयी लोकांना आकर्षण असते. आता राहासुद्धा आपल्या क्युट अंदाजाने सर्वांना आनंदी करते. या व्हिडीओमध्येसुद्धा पॅपराझी राहाला हाक मारुन तिची विचारपूस करत आहेत. राहासुद्धा त्यांना प्रतिसाद देत आहे. यादरम्यान रणबीर राहाचा हात धरून पापाराझींना नमस्कार करताना दिसला. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते प्रतिक्रिया देत आहेत.
लाईक्स आणि कमेंट्सा वर्षाव करत आहेत. पाच वर्ष डेट केल्यानंतर रणबीर आणि आलिया 2022 मध्ये लग्नबंधनात अडकले. 6 नोव्हेंबर 2022 ला राहाचा जन्म झाला. राहा ऋषी कपूर यांच्यासारखी दिसते असे मत अनेक नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या काही व्हिडीओमध्ये राहा आता मोठी झाली आहे, चालायला लागली आहे आणि छोट्या आलिया भटसारखी हुबेहुब दिसते असे म्हटले आहे.
हेही वाचा :
‘गुलाबी साडी’ गाण्यामागची कहाणी: संजू राठोडने सांगितली यशाची कथा
मनू भाकरच्या यशस्वी वाटचालीमागे गीतेचे धडे, गुरूंचा मार्गदर्शन, आणि तिची जिद्द
कोल्हापुरातील चक्क पोलीस मुख्यालयातून पोलिसांची दुचाकी लंपास