बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि आलिया भट्ट(message) ही बॉलिवूडच्या लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. दोघांची मैत्री खूप वर्षांपूर्वीची आहे आणि आज देखील त्यांच्यात खूप चांगली बॉन्डिंग आहे. काही वर्षांपूर्वी कतरिना कैफनं खुलासा केला होता की ती मध्ये रात्री आलियाला मेसेज करते. ज्यावर आलिया देखील लगेच रिप्लाय करते. चला तर जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण…

आलिया भट्ट आणि कतरिना कैफनं 2017 मध्ये BFFs विथ वोग शोमध्ये(message) एक एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. शोमध्ये दोघांनी ट्विनिंग केलं होतं. कतरिना कैफनं शोमध्ये खुलासा केला होता की एकदिवस रात्री तिच्यात आणि आलिया भट्टनमध्ये इन्स्टाग्रामवरून चर्चा झाली होती.
कतरिना कैफनं सांगितलं की आलिया इन्स्टाग्राम संबंधीत जोडलेल्या समस्यांना दूर करते. मध्यरात्री 2-3 वाजता तिला मेसेज करुन विचारते की माझा फोटो इन्स्टाग्रामवर फीट होत नाही आहे, मी काय करू? आलियानं मला फोटोला थोड लहान करण्याचा सल्ला दिला. मी तिला म्हटलं की मी तेच केलंय, तरी होत नाही. त्यानंतर कतरिनानं सल्ला दिला की कधी-कधी मला या गोष्टीटी जाणीव होते की आता रात्रीचे 1 वाजले आहेत आणि ही लोकांना प्रश्न करण्याची योग्य वेळ नाही.
आलिया भट्ट, कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा हे ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहेत. 2021 मध्येच त्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तरनं केले आहे. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की अजून हा चित्रपट मोठ्या पडद्यावर आलेला नाही.

कतरिना कैफ गेल्यावेळी मिस्ट्री-थ्रिलर चित्रपट मेरी क्रिसमसमध्य दिसली होती. त्यात तिच्यासोबत अभिनेता विजय सेतुपती महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर काही चांगली कामगिरी केली नाही. तर सध्या आलिया तिचा आगामी चित्रपट ‘अल्फा’ ला घेऊन चर्चेत आहे. हा एक स्पाय थ्रिलर आहे. आलिया सध्या याच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. दरम्यान,आजही आलिया आणि कतरिना आजही चांगल्या मैत्रिणी आहे.
कतरिना कैफ पुढे म्हणाली, ‘मला नंतर समजले की रात्रीचे २ वाजले आहेत आणि हा प्रश्न विचारण्याची ही योग्य वेळ नाही.’ हे ऐकून सगळे हसले. आलिया भट्टने रणबीर कपूरसोबत लग्न केले. पण रणबीर कपूर आधी कतरिना कैफला डेट करत होता. त्यांचे ब्रेकअप झाले असले तरी ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. शिवाय अभिनेत्री कतरिना कैफ विकी कौशल सोबत लग्न करुन खूप सुखी आहे. लवकरच आलिया, रणबीर आणि विकी कौशल एकत्र एका सिनेमात दिसणार आहे.
हेही वाचा :
लाडकी बहीण योजनेवर कोर्टाचा मोठा निर्णय, पहिल्या हप्त्याचं काय होणार?
दीरासोबत प्रेमाचं सूत जुळलं, पण नवऱ्याला सगळं कळलं; अन्…
कोहलीमुळे मैदानात ‘विराट’ राडा! हेल्मेट आपटलं… Video