महाराष्ट्रात विधानसभा(assembly) निवडणुकींची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. अशातच कार्यकर्त्यांच्या प्रचारसभा, एकमेकांच्या गाठीभेटी घेत आहेत. या सगळ्यात भाजप नेते रावसाहेब यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये दानवे यांनी एका कार्यकर्त्याला चक्क माथ मारली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. तसंच दानवेंच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. असं असताना आता ‘त्या’ कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर आली आहे.
शिवसेनेचे एकनाथ शिंदे पक्षाचे जालना मतदार संघातील उमेदवार (assembly)अर्जुन खोतकर दानवे यांची भेट घेण्यासाठी भोकरदन येथील दानवे यांच्या घरी गेले होते. त्यावेळेचा हा व्हिडीओ आहे. खोतकर दानवे यांचा बुके देऊन सत्कार करत असताना दानवे यांनी त्यांचे मित्र असलेल्या शेख अहमद यांना लाथ मारल्याच या व्हिडिओ समोर आला आहे.दरम्यान दानवे यांच्या विरोधकांकडून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल केला जात आहे. रावसाहेब दानवे यांचं शर्ट गुंतलेलं होत ते काढण्यासाठी मी गेलो होतो. त्यांनी मला लाथ मारली नसून आम्ही 30 वर्षांपासून मित्र असल्याचं शेख अहमद यांनी म्हटलं आहे.
भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर विरोधकांनी दानवेंवर टिकेची झोड उठवली आहे. दानवे यांनी कार्यकर्त्याला दिलेली वागणूक चुकीचं असल्याचं म्हणण्यात येत आहे. तसेच जरी कार्यकर्ता आणि दानवे हे मित्र असले तरीही अशापद्धतीची वर्तणूक योग्य नसल्याचं देखील म्हटलं जात आहे. भाजप नेत्यांची कृती अतिशय चुकीची आहे. यावरुन मानसिकतेचं दर्शन घडत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.
रावसाहेब दानवे यापूर्वी देखील आपल्या कृतीमुळे चर्चेत राहिले आहेत. यापूर्वी दानवे यांनी शेतकऱ्यांचा ‘साला’ म्हणून उल्लेख केला होता. तेव्हा देखील त्यांच्यावर टीकेची झोड उढली होती. अशाप्रकारच्या वादग्रस्त विधान आणि वक्तव्यामुळे रावसहेब दानवे कायमच चर्चेत आले आहेत.
हेही वाचा :
प्रचार रॅलीत चिडलेल्या महिलेवर सदा सरवणकरांंच्या मुलाचे गंभीर आरोप
पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, अमोल कोल्हेंचा अजित पवारांना टोला
राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच बाप लेकीचा राजकीय संघर्ष