पीसीओएस (पॉलीसिस्टिक ओव्हेरी सिंड्रोम) असलेल्या महिलांसाठी वजन कमी (weight loss)करणे हे नेहमीच आव्हानात्मक ठरते. या स्थितीत शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडल्याने अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. अलीकडेच एका दिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकाने बाळाच्या जन्मानंतर अवघ्या तीन महिन्यांत १५ किलो वजन कमी केले. मात्र, तज्ज्ञांच्या मते, इतक्या जलद वजन कमी करणं हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.
होलिस्टिका वर्ल्डचे संचालक आणि समग्र आरोग्य प्रशिक्षक डॉ. धर्मेश शाह यांनी या संदर्भात “द इंडियन एक्स्प्रेस”शी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्या मते, जलद वजन कमी करण्यामध्ये शरीरातील आवश्यक पोषक तत्वांची कमतरता होण्याची शक्यता असते, विशेषतः स्तनपान करणाऱ्या मातांसाठी. असे केल्यास मातेला आणि बाळाला आवश्यक पोषण मिळण्यात अडचण येऊ शकते, ज्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
डॉ. शाह यांनी स्पष्ट केले की, लक्षणीय आणि जलद वजन कमी केल्याने मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. प्रसूतीनंतर नैराश्य किंवा मूड बदलण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे माता आणि कुटुंबासाठी ही परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते.
पीसीओएस असलेल्या महिलांनी वजन कमी करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेऊनच आहार आणि व्यायामाची योजना आखावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. आरोग्याची काळजी घेत, हळूहळू आणि संतुलित वजन कमी करण्याचे तज्ज्ञांनी सुचवले आहे, ज्यामुळे दीर्घकाळ टिकणारे परिणाम मिळू शकतात.
हेही वाचा:
कोल्हापूरकरांना लवकरच मिळणार 100 इलेक्ट्रिक बसेस
नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समंथाची पहिली प्रतिक्रिया अखेर समोर
राजकारणातील मोठी बातमी; ‘या’ आमदाराने वाढवलं अजित पवारांचं टेंशन