रश्मिका मंदानाचा अपघात, सोशल मीडियावर चाहत्यांना दिला प्रकृतीत सुधाराचा अपडेट

मुंबई, 10 सप्टेंबर: ‘नॅशनल क्रश’ म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना (actor)गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सक्रिय नव्हती, ज्यामुळे तिचे चाहते चिंतेत होते.

आता, रश्मिकाने स्वतः इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांना आपल्याला अपघात झाल्याची माहिती दिली. तिने कॅप्शनमध्ये म्हटले की, “माझा छोटासा अपघात झाला, त्यामुळे मी सोशल मीडियावर सक्रिय नव्हते.”

https://www.instagram.com/p/C_skus8I20v/?utm_source=ig_web_button_share_sheet

रश्मिकाने पोस्टमध्ये आपल्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगत आपल्या चाहत्यांचे प्रेम आणि पाठिंब्यासाठी आभार मानले. सध्या ती पूर्णपणे बरी होत असून लवकरच पुन्हा कामावर परत येणार असल्याचेही तिने स्पष्ट केले.

हेही वाचा:

सांगलीत बेकायदा फलक आणि अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू: महापालिकेचे कठोर पाऊल

दमदार फिचर्ससह आयफोन 16 सिरीज लॉन्च: भारतात किंमत किती? प्रो आणि मॅक्स मॉडेल्सची सविस्तर माहिती!

योग्य वयात जीमला जाणे का महत्त्वाचे? जाणून घ्या फायदे आणि आरोग्याच्या दृष्टीने योग्य वय